Home शैक्षणिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १९ऑगस्टला प्रवेश परीक्षा

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १९ऑगस्टला प्रवेश परीक्षा

58 second read
0
0
41

no images were found

 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १९ऑगस्टला प्रवेश परीक्षा

 

   

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : पदवीप्राप्त आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठ अनुदान आयोग, यु.जी.सी. नवी दिल्ली योजनेअंतर्गत एस.सी, एस.टी, ओबीसी, ई.डब्ल्यू.एस (नॉन क्रिमीलेयर) व अल्पसंख्याक (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, आणि जैन) आणि खुल्या गटातील विदयार्थ्याकरिता शिवाजी विद्यापीठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात सन 2023 2024 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा अर्ज ऑफलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज व परीक्षा सूचना शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in) युजीसी सेंटर फॉर कोचिंग फॉर कॉम्पेटिटिव्ह एक्झामिनेशन्स वर उपलब्ध आहेत.  आणि अर्ज केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. दि.14 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रवेश अर्ज आवश्यक कागदपत्रासहित केंद्राच्या कार्यालयात जमा पाठवून द्यावेत तसेच केंद्राच्या कार्यालयात सकाळी 10.30 ते सायं 6.00 पर्यंत जमा करावेत, प्रवेश परीक्षा दि.19 ऑगस्ट 2023 रोजी सायं 4.00 ते 5.30 या वेळेत ऑफलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मानव्यशास्त्र इमारत, शिवाजी विद्यापीठात घेण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी 0231-2609371 या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा, असे संचालक डॉ. प्रकाश कांबळे यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…