no images were found
हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’
कोल्हापूर – राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. तरी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी स्वीकारले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, विश्व हिंदु परिषद जिल्हासहमंत्री श्री. विजय पाटील, शिवसेनेचे श्री. दुर्गेश लिंग्रस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदुत्वनिष्ठ श्री. संदीप घाटगे, बजरंग दलाचे शहर संयोजक श्री. अक्षय ओतारी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
1. शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी.
2. जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी.
3. सर्वच शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत.