
no images were found
मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडून क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील श्री.विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी श्री.राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठ येथील निवासस्थानी भेट देवून क्षीरसागर कुटुंबियांना या दुख:द घटनेतून सावरण्यास आधार देत सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय कै.विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील, श्री.धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर आदी क्षीरसागर कुटुंबीय उपस्थित होते.