no images were found
पर्तगाळी मठाचे 24 वे मठाधीश श्री श्री श्रीमद विद्याधीश स्वामीजीचे पंढरपूरकडे प्रस्थान
कोल्हापूर – ‘ व्यक्तीगत आणि सामाजिक सकारात्मकता वाढविण्या साठी श्रीराम तारक मंत्र जप महाप्रकल्पात आपले अधिकाधिक योगदान घावे ‘ अशी हितगुज पर साद घालत ऑक्टोंबर महिन्यात 550 व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या पर्तगाळी गोवा येथे मुख्यालय असलेल्या गोकर्ण पर्तगाळी मठाचे 24 वे मठाधीश श्री श्री विद्याधीश तीर्थ श्रीमद वडेर स्वामीजी यांनी पंढरपूर कडे आपल्या सहकारी अनुयाया समावेत प्रस्थान केले. गेले तीन दिवस अक्षता मंगल कार्यालयात त्यांच्या संत सहवासाचा आणि रसाळ वाणीतील प्रवचनाचा लाभ कोल्हापूर पंचक्रोशी सह गोवा , कारवार , बेळगांव , मंगलूर , उडपी , सांगली , सातारा , रत्नागिरी , सिंधुदुर्ग येथून आलेल्या भाविकां नी सहकुटुंब – सहपरिवार घेतला .
आगामी वर्षातील रामनवमी पर्यंत तमाम भक्तगण – अनुयायी यांच्या सहभागाने 550 कोटी ‘ श्रीराम जय राम जयजय राम ‘ या मंत्राचे पठण करून एक सामाजिक सकारात्मकता निर्माण करण्यासाठी चे करायचे आहे, त्याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करत त्यांनी उच्चार प्रात्याक्षिकासह सर्वाकडून त्यांचा सक्रीय सहभाग ही करूवून घेतला .
तसेच स्वामीजींनी येणाऱ्या निवडणुकी साठी सर्वांनी आपल्या परिवारासहित जाऊन मतदान करणे जरुरीचे आहे व हा आपला हक्क आहे तो बजावलाच पाहिजेच असे ही आग्रहाने नमूद केले . प्रवचना सह विविध शहरातून आलेल्या कुटुंबियाशी त्यांनी व्यक्तीगत संवाद साधला . तसेच सामाजिक – सांस्कृतिक – शैक्षणिक – राजकीय – क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांनी विविध विषयावर विचार मंथन केले .
या भव्य सोहळ्यासाठी सारस्वत समाज उपशाखा जी.एस.बी कोंकणी व्यासपीठ अध्यक्ष करुणाकर नायक, उपाध्यक्ष- सचिन शानभाग आणि सुरेंद्र प्रभू , सेक्रेटरी गुरुराज शानभाग, युवा – महिला आघाडी ,कामाक्षी बालिगा आणि सुमंगला पै, अक्षता मंगल कार्यालय, यात्री निवास सह कार्यकारणी समावेत – गोपाळी कामत, महेश शानभाग, सुशांत, श्रद्धा आणि शंतनु पै , उमेश आणि दिनेश प्रभू , सुरेश बलीगा , रामनाथ आणि राजेश बालिगा, महेश आणि उदय कामत , श्रीनिवास प्रभू , शेनोयमाम सदानंद पै, विनायक आणि आनंदु शानभाग , नित्यानंद प्रभु , श्रेया, कार्तिक , स्नेहा आणि मनोज शानभाग सह सर्व कार्यकर्त्या नी विशेष परिश्रम घेतले .
अस्सल सारस्वत विविध भाज्या – सार लोणची, गोड – धोड पदर्थासह तीन दिवस कांदा लसूण न वापरता सात्विक प्रसाद भोजनाची ही काटेकोर व्यवस्था केली, आणि त्याविषयी सर्वांनीच केलेले अभिनंदन हे ही तीन दिवशीय सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले .
आगामी कोल्हापुरातील मठ – संस्कार वर्ग उभारणीसाठी – श्रीपाद कामत आणि परिवाराने सर्वप्रथम एक लाख रुपये देगणी धनादेश दिला, तसेच महालक्ष्मी – अंबाबाई चरणी अर्पण केलेले महावस्त्र साडीही त्यांनी 52 हजार रुपयास घेतली या बददल आणि तीन दिवस आणि दिड महिन्यापासून संयोजनात सक्रीय संयोजक स्त्री – पुरुषाचा – युवकाचा स्वामीजी च्या हस्ते या परिवराचा श्रीफळ ,फुले व पुजित अक्षता देवून सत्कार करण्यात आला . समारोपात तीन दिवसाचा विविध पैलूच्या झालेल्या कामाचा आढावा जी एस बी कोंकणी व्यासपीठ चे अध्यक्ष करुणाकर नायक यांनी घेतला तर यासाठी मदत करणारे सर्व संस्था – प्रतिनिधी – मिडिया यांचे आभार सचिव सचिन शानभाग यांनी मानले . श्रीराम तारक मंत्र पठण महा प्रकल्पासह आगामी काळात कोल्हापुरी मठशाखा – संस्कार केंद्र उभारणीचा स्वामीजी च्या साक्षीने सर्वांनी केलेला निर्धार यामुळे संयोजक जी एस बी कोंकणी परिवरातील सर्वांनीच समाधान व्यक्त केले .