
no images were found
भगवान महावीर अध्यासनास श्री. बाळासाहेब शामराव देसाई यांची बृहत देणगी
श्री. बाळासाहेब शामराव देसाई, सांगली यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी ५० हजार रू. बृहत देणगी दिली.
श्री. बाळासाहेब देसाई हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते सध्या ते सांगली येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी या पूर्वी देखील ५१००० रू देणगी दिली होती. त्यांची आतापर्यत १०१००० एवढी देणगी दिली आहे. सदर बृहत देणगी बद्दल मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तसेच मा. कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी आपले अभिनंदन केले आहे. भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस (100 %) पात्र आहे.