no images were found
“रन फॉर वोट” मॅरेथॉन स्पर्धेसाठी वाहतूक मार्गात बदल
कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक – 2024 साठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत स्वीप अतंर्गत “RUN FOR VOTE” या लोकशाही मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. “चला धावू या सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करुया लोकशाहीसाठी” हे लोकशाही मॅरेथॉनचे ब्रीद वाक्य असणार आहे. दिनांक 7 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 5 ते स्पर्धा संपेपर्यंत वाहतूक तात्पुरती बंद व पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी जारी केले आहेत. तसेच स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांनी आपली वाहने पोलीस उद्यान समोरील खुल्या जागेत पार्क करावीत.
मॅरेथॉन स्पर्धा अलंकार हॉल परेड ग्राउंड ते पितळी गणपती ते धैर्यप्रसाद ते अजिंक्य तारा ते आदित्य कॉर्नर ते कलेक्टर ऑफिस चौक ते खानविलकर पेट्रोल पंप ते सीपीआर हॉस्पीटल चौक ते महानगरपालिका चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते भवानी मंडप, जेल रोड, बिंदु चौक व त्याच मार्गाने परत अलंकार हॉल परेड ग्राउंड दरम्यानच्या मार्गावर ३ कि.मी, ५ कि.मी. व १० कि.मी. अशी मॅरॅथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या मार्गावरील स्पर्धेदरम्यान स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिला व लहान मुले यांची व नागरीकांची गैरसोय होवू नये, वाहतुकीची कोंडी होवू नये. सामान्य जनतेस नियमित व्यवहार पार पाडण्यास अडसर निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३४ नुसार वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
अ) वाहतुकीसाठी प्रवेश बंद केलेला व पर्यायी मार्ग :-
पोलीस अधीक्षक, कार्यालय ते धैर्यप्रसाद चौक जाणाऱ्या सर्व वाहनांकरीता पोलीस अधीक्षक कार्यालय चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने ४ नं. फाटक, लाईन बाजार चौक, सर्कीट हाऊस मार्गे पुढे मार्गस्थ होतील. पितळी गणपती ते पोलीस अधीक्षक कार्यालय अगर धैर्यप्रसाद चौकाकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना पितळी गणपती चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने पोस्ट ऑफिस चौक, पोलीस अधीक्षक, कार्यालय, ४ नं. फाटक, लाईन बाजार चौक, सर्कीट हाऊस मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
धैर्यप्रसाद चौक कडून पितळी गणपती, पोलीस अधीक्षक, कार्यालय चौकाकडे जाणा-या तसेच धैर्यप्रसाद चौक ते आदित्य कॉर्नरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना धैर्यप्रसाद चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने सर्कीट हाऊस मार्गे पुढे मार्गस्थ होतील. आरटीओ ऑफिस कडुन अजिंक्यताराकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना आरटीओ ऑफिस कॉर्नर अजिंक्यतारा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने पितळी गणपती चौक, पोस्ट ऑफिस चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
दाभोळकर सिग्नल, सासने ग्राउंड, आदित्य कॉर्नर व हिरा पन्ना मार्गे कलेक्टर ऑफिस चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आदित्य कॉर्नर व हिरा पन्ना येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने ले.ज.एस.पी. थोरात बंगला चौक, हॉटेल पलश, धैर्यप्रसाद चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. नागाळा पार्क कमान येथून कलेक्टर ऑफिस रोडला येणा-या सर्व वाहनांना नागाळा पार्क कमान येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने विवेकानंद कॉलेज, पितळी गणपती मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
जिल्हा परीषद परीसर, हॉटेल म्हावरा मार्गे कलेक्टर ऑफिस रोडला येणा-या सर्व वाहनांना म्हावरा हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने म्हावरा हॉटेल, पाटलाचा वाडा चौक, महावीर कॉलेज मार्गे पुढे मार्गस्थ होतील. कलेक्टर ऑफिस चौकात येणारी सर्व प्रकारची वाहतुक पकंज पेंटस, पाटलाचा वाडा, खानविलकर पेट्रोल पंप येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावयाचा आहे.
महावीर कॉलेज चौक कडुन खानविलकर पेट्रोल पंपाकडे येणा-या सर्व वाहनांना खानविलकर पेट्रोल पंप येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावयाचा आहे. दसरा चौक येथुन जुने ट्रॅफिक ऑफिस व जयंती नाल्याकडे येणा-या सर्व वाहनांना दसरा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने व्हिनस कॉर्नर मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
शनिवार पोस्ट ऑफिस चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौक, सीपीआर चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील. महाराणा प्रताप चौकातुन महानगरपालिकेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना महाराणा प्रताप चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने आईसाहेब महाराज पुतळा, स्वयंभू गणेश मंदिर चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
बिंदु चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जाणा-या सर्व वाहनांना बिंदु चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहतुक मिलन हॉटेल चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होईल. जोतीबा रोडवरुन भवानी मंडपकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शेतकरी मेडीकल दुकान तसेच महाद्वार रोड येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
ब) आवश्यकतेनुसार सुरु बंद करण्यात येणारे मार्ग-
सीपीआर चौकातुन जाणारी येणारी सर्व वाहतुक आवश्यकतेनुसार बंद व सुरु करण्यात येईल. माळकर सिग्नल चौकातुन जाणारी येणारी सर्व वाहतुक आवश्यकतेनुसार बंद व सुरु करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातुन जाणारी येणारी सर्व वाहतुक आवश्यकतेनुसार बंद व सुरु करण्यात येईल.
स्पर्धेकरीता आलेल्या, स्पर्धकांनी आपली वाहने पोलीस उद्यानासमोरील खुल्या जागेत पार्क करावीत. या वाहतुक नियोजनास मोटार वाहन चालक, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्री. पंडित यांनी केले आहे.