
no images were found
वागले की दुनिया’ मालिका यावर भर देते की, पालकत्वाच्या भूमिका लिंगानुसार ठरत नाहीत
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया – नई पीढी नए किस्से’ हे एक कौटुंबिक नाट्य आहे, जे सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात भेडसावणार्या आव्हानांचे प्रतिबिंब दर्शवते. ही मालिका मध्यमवर्गीय वागले कुटुंबियांचा नित्य संघर्ष आणि त्यांचे यश यांचा मागोवा घेते. अलीकडील भागांमध्ये, ही मालिका सिंगल पालक असण्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकते. किट्टूच्या(माही सोनी) शाळेत पालक-शिक्षक सभेच्या वेळी आपली आई, यामिनी(मानसी जोशी) हजर न राहिल्यामुळे ती नाराज झाली आहे.प्रत्येक वेळी तिच्या आईच्या जागी तिचे वडील दक्कू(दीपक पारीक) येतात, त्यामुळे तिची चिडचिड होते.
त्यामुळे निराश होऊन किट्टू वागले कुटुंबियांचा सल्ला घेते, जे तिला दक्कूचे महत्त्व पटवून देतात. काही दिवसांनी, किट्टूची शाळेतील वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ‘मेरी माँ’ या विषयावर बोलायचे आहे. तथापि, जेव्हा किट्टू तिच्या भाषणाची सुरुवात करताना आपल्या आयुष्यातील दक्कूची भूमिका आणि वडील व आई या दोन्ही जबाबदार्या तो पार पाडत असल्याची कबुली देते, तेव्हा दक्कू तसेच वागले कुटुंबीय थक्क होतात. परिवा प्रणती उर्फ वंदना वागले हिने लिहिलेल्या या कथेत एक वडील एकट्याने वडील आणि आई या दोन्ही भूमिका कसे पार पाडू शकतात याचे सुंदर चित्रण केले आहे.
वंदना वागलेची भूमिका साकारणारी परिवा प्रणती म्हणते, “प्रत्येक यशस्वी मुलाच्या मागे एक पालक असतो जो लिंगभेदापलीकडे जाऊन त्याच्यामागे उभा राहतो. या कथानकातही आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुटुंबाची व्याख्या पारंपारिक भूमिकांद्वारे होत नाही तर प्रेम आणि समर्पणाने केली जाते. किट्टूसारखी अनेक मुले आहेत, ज्यांच्या घरी एकजण त्यांची काळजी घेते तर दुसरा काम करत आहे. आपल्या मुलाला दोन्ही पालकांचे प्रेम मिळावे यासाठी, घरी राहणारे वडील किंवा आई जे कष्ट करतात, त्याग करतात, त्याची कदर करणे आवश्यक आहे.”