Home शैक्षणिक डीकेटीई ‘आयआयटी बॉम्बे आंतरराष्ट्रीय ई-यंत्रा रोबोटीक्स‘ स्पर्धेमध्ये देशात अव्वल

डीकेटीई ‘आयआयटी बॉम्बे आंतरराष्ट्रीय ई-यंत्रा रोबोटीक्स‘ स्पर्धेमध्ये देशात अव्वल

5 second read
0
0
19

no images were found

डीकेटीई ‘आयआयटी बॉम्बे आंतरराष्ट्रीय ई-यंत्रा रोबोटीक्स‘ स्पर्धेमध्ये देशात अव्वल

इचलकरंजी  – डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरींग इन अर्टिफिशएल इंटेलिंजन्स विभागात शिकणारे विद्यार्थी सृजन हुक्केरीकर, निरज मिराशी, श्रेयश मोहिते, तृतीयवर्ष सीएसई मधील अपूर्वा थोरवत यांनी आयआयटी बॉम्बे येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ई-यंत्रा रोबोटीक्स‘ स्पर्धेत सहभाग घेवून ६५० संघामधून प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळवले. तर डीकेटीईचा आणखीन एक संघ सीएसई एआय मधील गजेंद्रसिंह राजपूरोहित, नोमान खातीब, प्रथमेश डाळया व शुभम चौधरी यांनी ‘ल्युमिनोसिटी ड्रोन‘ श्रेणीमध्ये या स्पर्धेमध्ये ४५० संघामधून चौथे स्थान आणि उपविजेतेपद मिळविले आहे. जागतिक पातळीवरील आयआयटी बॉम्बे या स्पर्धेमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे डीकेटीई व इचलकरंजीसाठी भूषणावह आहे.
दरवर्षी ई-यंत्रा रोबोटीक्स ही स्पर्धा आयआयटी बॉम्बे येथे भरविण्यात येते या स्पर्धेत जगभरातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी होत असतात या वर्षी १०९० हून अधिक संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. भविष्यातील रोबोटीक्स क्षेत्रातील नविन संधी आणि तंत्रज्ञान यावर आधारीत असणा-या या रोबोटीक्स स्पर्धेमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखवत, नाविण्यपूर्ण दृष्टीकोन ठेवून, उत्कृष्ट प्रकल्पाचे सादरीकरण करत देशात अव्वल स्थान पटकविले आहे. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांच्या या रोबोटीक्स मधील तांत्रिक कौशल्याची व कामगीरीची उच्चस्तरीय पर्यवक्षेक व आयआयटी बॉम्बे येथील प्राध्यपकांनी देखील दखल घेतली व गौरवउदगार काढून भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानावर आधारित रोबोची निर्मिती केली व रोबोट चे सादरीकरण केले व त्यानंतर ग्रुप इंटरव्हुव द्वारे विद्यार्थ्यांची चाचणी घेतली गेली विद्यार्थ्यांनी तयार कलेल्या रोबोला उपस्थित सर्वांनी पसंती दर्शवली व डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना प्रथम व चतृर्थ क्रमांक देवून गौरवण्यात आले. सदर प्रोजेक्ट हा डीकेटीईच्या आयडीया लॅब मध्ये बनविला आहे यासाठी आयडीया लॅब व आयआयसी टीम यांचे सहकार्य लाभले. डीकेटीई मध्ये अनेक अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅबोरेटरीज आहेत येथे प्रत्यक्षात प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते यामुळेच असे दर्जेदार प्रकल्प विकसीत होत असतात व डीकेटीईचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असतात. अगदी प्रथम वर्षापासून विद्यार्थी या आयडिया लॅब मध्ये मिनी प्रकल्पापासून मोठमोठया संशोधनात्मक प्रकल्पाची दर्जेदारपणे निर्मिती करत असतात त्याची परिणीती अशा यशामध्ये होत असते.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी प्रकल्प तयार केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या प्र. संचालिका डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे.पाटील, डीन व विभागप्रमुख एआय, डॉ. एस.के.शिरगावे, विभागप्रमुख सीएसई डॉ डी.व्ही.कोदवडे उपस्थित होते. सदर प्रोजेक्टसाठी विद्यार्थ्यांना प्रा. यु.ए.नुली,प्रा.व्ही.बी.कुंभार,प्रा.एस.बी.रायजाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…