no images were found
इनोव्हेशन प्रकल्प सादरीकरणात विद्यापीठाच्या बंडू कोळी याचे यश
कोल्हापूर (प्रतिनिधी) :शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाचा विद्यार्थी बंडू कोळी याने विद्यापीठासह राज्यस्तरीय इनोव्हेशन स्पर्धेत यश संपादन केले आहे.
विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागात प्रथम वर्षात शिकणाऱ्या बंडू कोळी याने ‘Biofertilizer from discarded media and water Hygiene’ या विषयावर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत इनोव्हेशन प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाला तेथे प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तत्पूर्वी, त्याने विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन आणि वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे प्रथम आणि दुसरा क्रमांक प्राप्त केला. सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात आयोजित सेमिनारमध्येही तृतीय क्रमांक मिळविला. कोळी याला अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. ज्योती जाधव, डॉ. प्रदीप गुरव, डॉ. पंकज पवार, डॉ. संदीप काळे यांचे मार्गदर्शन लाभले.