no images were found
अस्पेन प्लस सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी – डॉ. एम .एन . पाटील
डी . वाय . पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण
कसबा बावडा ( प्रतिनीधी) :अस्पेन प्लस या प्रोसेस सिम्युलेशन सॉफ्टवेआरमुळे केमिकल क्षेत्रातील इंजिनिअर्सऔद्योगिक रासायनिक प्रक्रियेसाठी मॉडल तयार करून त्याचा विकास करू शकतात. याच्या प्रशिक्षण व ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वास पाटील अँड अससोसिएट्स कागलचे संचालक डॉ. एम .एन . पाटील यांनी व्यक्त केला.
डी . वाय . पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनीरिंग विभागातर्फे आयोजित पंधरा दिवसीय अस्पेन प्लस सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या सॉफ्टवेअरचा वापर कृत्रिम उत्पादन, रसायनशास्त्रीय प्रक्रिया आणि उर्जा विनिमयसाठी करून विद्यार्थी त्यांच्या करियरला साठी नवननवी दिशा देऊ शकतील असा विश्वास डॉ. पाटील यानी यावेळी व्यक्त केला.
या प्रशिक्षणाचे उदघाटन केमिकल विभागप्रमुख डॉ. के .टी जाधव, अधिष्ठाता संशोधन डॉ . ए . एल . जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे नियोजन विभागाचे वरिष्ठ शिक्षक डॉ. राहुल पाटील यांनी केले.
या प्रशिक्षणासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, ट्रस्टी आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए .के . गुप्ता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस . डी . चेडे , रेजिस्ट्रार डॉ. एल . व्ही . मालदे आणि विभागातील इतर सर्व प्राध्यापक या सर्वांचे सहकार्य लाभले.