no images were found
निखिल दिनकर पाटील यांच्यावर विनापरवाना बोर्ड लावल्याने गुन्हा दाखल
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत गुरुवारी डिजिटल बोर्ड, जाहिरात फलक यांच्यावर विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत विनापरवाना व शहर विद्रुपीकरण कलम 3 व ४ अंतर्गत बोर्ड लावणाऱ्या उचगांव येथील शाहू मिल कॉलनी येथील निखिल दिनकर पाटील यांच्यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 3 व 4 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
या कारवाई अंतर्गत कावळा नाका धैर्य प्रसाद हॉल ते आदित्य कॉर्नर कलेक्टर ऑफिस ते खामकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज, रमणमळा, भगवा चौक ते शुगर मिल ते कलेक्टर ऑफिस, बसंत बहार रोड ते लक्ष्मीपुरी, रिलायन्स मॉल ते पार्वती टॉकीज, बागल चौक, राजारामपुरी या परिसरातील मुख्य रस्त्यावरील लाईट पोल वरील लावण्यात आलेले 53 अनाधिकृत डिजिटल बोर्डवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.