no images were found
एसटीईएम क्षेत्रात समान लैंगिक प्रतिनिधीत्वासाठी आयआयएम-मुंबई – पीअॅण्डजी इक्वॅलिटी अॅण्ड इन्क्लुजन समिट च्या ४थ्या पर्वाचे आयोजन
मुंबई : प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल इंडिया (पीअॅण्डजी इंडिया) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई (आयआयएम-एम) यांनी आज आयआयएम-मुंबई – पीअॅण्डजी इक्वॉलिटी समिट २०२४च्या २०२४ एडिशनचे आयोजन केले.
विमेन रिवॉल्युशनायझिंग सप्लाय चेन अॅण्ड मॅन्युफॅक्चुरिंग थीम असलेल्या या एक-दिवसीय समिटमध्ये सरकार, कॉर्पोरेट क्षेत्र व शैक्षणिक संस्थांमधील प्रमुख भागधारकांनी सप्लाय चेनमध्ये लैंगिक समानतेला गती देणे आणि एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित) करिअरमधील महिलांच्या प्रतिनिधीत्वाशी संबंधित गैरसमजांना दूर करणे यासंदर्भात चर्चा केली, जेथे सप्लाय चेन व उत्पादनावर मुख्यत्वे फोकस देण्यात आला. मुंबईतील यूएस कॉन्सुलेटचे कौन्सुल जनरल श्री. माइक हँकी या इव्हेण्टचे सन्माननीय अतिथी होते. तसेच प्रतिष्ठित प्रमुखांसह मान्यवरांनी उपस्थिती दाखवून या इव्हेण्टची शोभा वाढवली जसे आयआयएम मुंबईचे संस्थापकीय संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी, पीअॅण्डजी एशिया, मिडल ईस्ट व आफ्रिकाचे उत्पादन पुरवठ्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष सचिन मिराशी, भारतातील माँडेलीझच्या सप्लाय चेनचे उपाध्यक्ष वेंकट वेनेपल्ली, पेप्सीकोच्या सप्लाय चेन डिजिटायझेशन अॅण्ड ट्रान्सफॉर्मेशन, एएमईएसए सेक्टरच्या प्रमुख कुसुम एस., इंडिया सेंटरमधील जनरल मिल्सच्या साइट लीड मोनिका पोथीरकर.
पीअॅण्डजी इंडिया आणि आयआयएम-मुंबई या वार्षिक इव्हेण्टसाठी सतत एकत्र येत आहेत, ज्यामागे महिलांच्या प्रतिनिधीत्वासंदर्भात असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्याचा, आजही अस्तित्त्वात असलेल्या रूढींचे निराकरण करण्याचा आणि विशेषत: एसटीईएम व सप्लाय चेनमधील समान प्रतिनिधीत्वाशी संबंधित परिवर्तनाला गती देण्याचा मनसुबा आहे. यंदाच्या इव्हेण्टने दीर्घकालीन प्रभाव निर्माण केला, ज्यामध्ये कर्मचारीवर्गामध्ये महिलांच्या अधिकाधिक समावेशासंदर्भात प्रेरणादायी भाषण व डायनॅमिक पॅनेल चर्चासत्रांचा समावेश होता. या चर्चासत्रांमधून सप्लाय चेन क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रतिनिधीत्वाला गती देण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे व उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली, ज्यामुळे लैंगिक समानतेला गती देण्यासाठी प्रबळ दर्जा स्थापित करण्यात आला. तसेच, इव्हेण्टदरम्यान पीअॅण्डजी इंडियाने आयआयएम मुंबई येथे एसटीईएम कोर्सेसचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थीनींना पीअॅण्डजी शिक्षा बेटियाँ स्कॉलरशिप प्रदान केली. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ही स्कॉलरशिप पीअॅण्डजी इंडियाचा प्रमुख सीएसआर उपक्रम पीअॅण्डजी शिक्षाचा भाग आहे, जेथे सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीसोबत सहयोगाने कंपनी देशभरातील एसटीईएम शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या मुलींना आर्थिक साह्य व मार्गदर्शन देण्याप्रती काम करत आहे.
याप्रसंगी मत व्यक्त करत पीअॅण्डजी इंडियाचे उपाध्यक्ष आणि चीफ सप्लाय चेन ऑफिसर अंकुर भगत म्हणाले, १८५ वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत असलेल्या कंपनीमध्ये आम्ही जगभरातील आणि भारतातील अब्जो ग्राहकांना सेवा देण्याप्रती कटिबद्ध आहोत. आमचा दृढ विश्वास आहे की, त्यांना सर्वोत्तम सेवा देण्याची आमची क्षमता त्यांच्या विविधतेचा आदर व अवलंब करण्यामध्ये, त्यांच्या अद्वितीय गरजा समजून घेण्यामध्ये आणि त्यांना अपवादात्मक उत्पादने व सेवा प्रदान करण्यामध्ये सामावलेली आहे. आमचा आमच्या कंपनीमध्ये या विविधतेला सादर करण्याचा आणि आमच्या संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणून इक्वॅलिटी व इन्क्लुजनचा अवलंब करण्याचा मनसुबा आहे. या विश्वासाशी बांधील राहत आम्ही एसटीईएम क्षेत्रांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढवण्याचे आमचे प्रयत्न सुरू ठेवण्याच्या उद्देशाने इक्वॅलिटी समिटचे चौथे पर्व आयोजित करण्यासाठी आयआयएम मुंबईसोबतचा आमचा सहयोग सुरू ठेवला आहे. हा सहयोग आम्हाला आवाहन करण्यास आणि कमी प्रतिनिधीत्वाच्या मूळ कारणांचे निराकरण करण्यास मदत करतो. या समिटमधून आमचे सहयोगात्मक प्रयत्न दिसून येण्यासोबत भागधारक म्हणून आम्ही परिवर्तनाला कशाप्रकारे गती देऊ शकतो हे देखील निदर्शनास येते. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. मनोज तिवारी म्हणाले, आयआयएम मुंबईने आयआयएम-मुंबई पीअॅण्डजी इक्वॅलिटी समिटच्या चौथ्या पर्वासाठी पुन्हा एकदा पीअॅण्डजी इंडियासोबत सहयोग केला आहे, जे अत्यंत अभिमानास्पद आहे. थीम विमेन रिवॉल्युशनायझिंग सप्लाय चेन अॅण्ड मॅन्युफॅक्चुरिंग आमच्या संस्थेची मुलभूत तत्त्वे विविधता व सर्वसमावेशकता यांच्याशी संलग्न आहे. आमच्या प्रवेश प्रक्रिया आणि समर्पित डीईआय सेल क्रियाकलापांच्या माध्यमातून आम्ही सक्रियपणे अधिक वैविध्यपूर्ण विद्यार्थी समूहाला चालना देत आहोत आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य
देण्यासाठी भावी लीडर्सना सुसज्ज करत आहोत. यंदाच्या पर्वामध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्यात आली, जे सुरू असलेली चर्चा व कृतीसाठी उत्प्रेरक आहे. आमचा सहभागींना विद्यमान अडथळ्यांना दूर करत या महत्त्वपूर्ण उद्योगांमध्ये महिलांच्या नेतृत्वाला अग्रस्थानी आणण्यासाठी साधने व धोरणांसह सुसज्ज करण्याचा मनसुबा आहे. या समिटमधून सहयोगाची क्षमता दिसून येते आणि आमचा विश्वास आहे की यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा होईल, जेथे महिला
उत्तमरित्या प्रतिनिधीत्व करण्यासोबत सप्लाय चेन व उत्पादनाच्या भविष्याला सक्रियपणे आकार देखील देतील.'' यंदा, समिट ४०० हून अधिक एसटीईएम संस्थांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे एसटीईएम क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासह निपुण होणाऱ्या महिलांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चेला गती मिळाली आहे.
प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल बाबत: पीअॅण्डजी भारतातील ग्राहकांना विश्वसनीय, दर्जात्मक व प्रमुख ब्रॅण्ड्सच्या प्रबळ पोर्टफोलिओची सेवा देते. या पोर्टफोलिओमध्ये विक्स®, एरियल®, टाइड®, व्हिस्पर®, ओले®, जिलेट®, वीनस®, अॅम्बीप्युअर®, पॅम्पर्स®, पॅन्टीन®, ओरल-बी®, हेड अॅण्ड शोल्डर्स®, हर्बल एसेन्सेस®, ब्रॉन® आणि ओल्ड स्पाईस® यांचा समावेश आहे. अद्ययावत बातम्या आणि पीअॅण्डजी इंडिया व तिच्या ब्रॅण्ड्सबाबत सविस्तर माहितीसाठी कृपया in.pg.com येथे भेट द्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (आयआयएम-एम) बाबत: आयआयएम मुंबई भारतातील टॉप रँकचे बी-स्कू आहे. आयआयएम मुंबईचा मॅनेजमेंट श्रेणीमधील एनआयआरएफ रँकिंग २०२२ मध्ये ९वा क्रमांक आहे, तसेच क्वॉलिटी एज्युकेशनमध्ये दुसरा क्रमांक आणि टाइम्स हायर एज्युकेशन (टीएचई) इम्पॅक्ट रँकिंग्ज २०२२ द्वारे भारतातील डिसेंट वर्क अॅण्ड इकॉनॉमिक ग्रोथमध्ये तिसरा क्रमांक आहे.