
no images were found
नॅनो सायन्सचा विनय पाटील करणार दक्षिण कोरियात पीएच.डी.
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागातील विद्यार्थी विनय पाटील (रा. इस्लामपुर, जि. सांगली) याची दक्षिण कोरिया येथील क्युंग ही युनिव्हर्सिटी येथे ऑर्गेनिक ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये पीएचडी साठी निवड झाली आहे. विनयला अधिविभागातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सुशिलकुमार जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. विनयने २०१७ ते २०२२ या कालावधीत बीएससी -एमएससी नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (पाच वर्षाचा एकात्मिक) अभ्यासक्रम पूर्ण केला. अधिविभागात ग्रॅज्युएशनपासूनच योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे तसेच संशोधनाची आवड निर्माण झाल्यामुळे हे यश मिळवू शकलो,
अशी भावना विनय याने व्यक्त केली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी संचालक डॉ. किरण कुमार शर्मा यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.