Home क्राईम विदेशी दारू प्रकरणी बॉलीवूड मधील उच्चभ्रूसह चौघांना अटक

विदेशी दारू प्रकरणी बॉलीवूड मधील उच्चभ्रूसह चौघांना अटक

0 second read
0
0
309

no images were found

विदेशी दारू प्रकरणी बॉलीवूड मधील उच्चभ्रूसह चौघांना अटक

ठाणे : बॉलिवूड कलाकार, सेलिबे्रटींसह तब्बल अडीच हजार उच्चभ्रूंना ऑनलाईन घरपोच बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणाऱ्या नशी बाभणीया (३८) याच्यासह चौघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने अटक केल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली. त्यांच्याकडून बनावट आयात विदेशी मद्याच्या तयार बाटल्या आणि आयात विदेशी मद्याच्या विविध ब्रॅन्डच्या रिकाम्या बाटल्या असा २७ लाख ७३ हजार ४०५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बॉलिवूडचे कलाकार तसेच सेलिब्रेटींना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांना मिळाली होती. त्याच आधारे १५ मार्च २०२४ रोजी उत्पादन शुल्क विभागाचे संचालक डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागीय ठाण्याचे उपायुक्त पवार आणि मुंबईचे अधीक्षक नितीन ष्घुले यांच्या मार्गदर्शनाखाली मद्य निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक राजेंद्र शिर्के, राजू वाष्घ, जवान सुनिल टोपले, अण्णा उडीयार आणि तेजस्वी मयेकर आदींच्या पकाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर ऑनलाईन द्वारे परदेशातील विदेशी मद्य (स्कॉच) विक्रीच्या उद्देशाने ष्घरपोच देण्यात येईल, अशा स्वरुपाच्या जाहिरातीची पडताळणी केली. त्यानुसार या पकाने जुहू तारा रोड, मालाड आणि ठाण्यातील मीरा रोड भागात सापळा रचून एका रिक्षामध्ये आलेल्या बनावट विदेशी मद्याच्या स्कॉचच्या विविध नामांकित कंपन्यांच्या २४ बाटल्या जप्त केल्या. यामध्ये नशी बाभणिया, भरत पटेल (५१), विजय यादव (४५) आणि दिलीप देसाई (६२) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत मालाड आणि मीरा रोड ये आयात विदेशी मद्य बनविण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये विविध ब्रॅन्डच्या बनावट आयात विदेशी मद्याच्या १२५ तयार बाटल्यांसह बाटल्यांमध्ये मद्य पॅकींगची सामुग्री आणि रिक्षा असा २७ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …