no images were found
लोकसभा निवडणूक : जिल्हा तक्रार समिती गठीत
कोल्हापूर : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर सिझर अँण्ड रिलिज ऑफ कॅश ॲण्ड ऑदर आयट्मस रजिस्टर (Standard Operating Procedure for Seizure and release of Cash and Other items reg.) निश्चित करण्यात आली आहे. तथापि जप्ती (Seizure) प्रक्रियेदरम्यान पोलीस विभागाकडे एफआयआर किंवा तक्रार दाखल न करता कोषागारामध्ये कॅश किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवले असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आल्यामुळे अशा घटनांवरुन संबंधित व्यक्तींना होणारा त्रास कमी करण्याच्या हेतूने तसेच प्राप्त तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी तसेच अशा प्रकरणी जप्ती (Seizure) करताना मानक प्रक्रियेचा काटेकोर अवलंब करण्यात आला आहे अगर कसे ? तसेच मानक प्रक्रियेनुसार अन्य बाबींची छाननी, पडताळणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील जिल्हा तक्रार समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद- अध्यक्ष, जिल्हा कोषागार अधिकारी – सदस्य, नोडल ऑफिसर, निवडणूक खर्च परिक्षण (EEM) व व्यवस्थापन तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद – सदस्य सचिव याप्रमाणे समिती गठित करण्यात आली असून समितीची कार्यकक्षा व अधिकार कक्षा वरीलप्रमाणे असणार आहे.
नोडल ऑफिसर, निवडणूक खर्च परिक्षण (EEM) व व्यवस्थापन तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर, भ्रमणध्वनी क्रमांक 8275484082 यांनी जिल्हा तक्रार समिती यांनी Cash Release बाबत घेतलेल्या निर्णयाच्या व कार्यवाहीच्या अनुषंगाने अभिलेख ठेवून ते जतन करावयाचे आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.