Home सामाजिक शहरातील  ३०,००० हुन अधिक स्ट्रीट लाईट्स १ तास रहाणार बंद -ऊर्जा बचत  व पर्यावरण संरक्षणाचा संदेश

शहरातील  ३०,००० हुन अधिक स्ट्रीट लाईट्स १ तास रहाणार बंद -ऊर्जा बचत  व पर्यावरण संरक्षणाचा संदेश

36 second read
0
0
38

no images were found

 

शहरातील  ३०,००० हुन अधिक स्ट्रीट लाईट्स १ तास रहाणार बंद -ऊर्जा बचत  व पर्यावरण संरक्षणाचा संदेश

कसबा बावडा/ वार्ताहर

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व  एडवेंचर क्लबच्यावतीने शनिवार दिनांक २३ मार्च रोजी  ‘अर्थ अवर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या दिवशी रात्री १ तास विजेची उपकरणे बंद ठेवून वीज बचत व पर्यावरण  रक्षणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  शिवाजी विद्यापीठ  आणि कोल्हापूर महानगरपालिका  यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.
       याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी सांगितले कि वर्ल्ड वाईड फंड (WWF) या जागतिक स्तरावर कार्यरत एन.जी.ओ. कडून जगभरात  २३ मार्च  रोजी  अर्थ अवर’चे आयोजन केले जाते.   वाढत्या  तापमानामुळे जो असमतोल निर्माण झाला आहे त्याला काही अंशी आळा घालण्यासाठी हा उपक्रम आहे.
      उपक्रमाचे समन्वयक प्रा- योगेश चौगुले व डीन स्टुडंट्स अफेअर डॉ.राहुल पाटील म्हणाले कि शनिवारी  कोल्हापूर शहरातील आय. आर. बी. अंतर्गत बल्ब हायमास्ट दिवे व एल.ई.डी. असे ३०,००० हुन अधिक स्ट्रीट लाईट्स सायकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत बंद राहणार आहेत. नागरिकांनीही  या  कालावधीत लाईट व अनावश्यक विद्युत उपकरणे बंद ठेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे. उर्जाबचत व पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा.
       भारतातील सुमारे ५७ शहरे आपआपला सहभाग प्रातिनिधिक स्वरुपात नोंदवणार आहेत.नेल्सन मंडेला, सचिन तेंडूलकर, आमीर खान, अभिषेक बच्चन व विद्या बालन यांनी उपक्रमास पाठींबा दिला आहे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी बिंदू चौक येथे रात्री ७.३० वा. पणत्यांपासून अर्थ अवरचा ६०+ हा लोगो तयार करण्यासाठी सहभागी होतील. नागरिकांनाही यात सहभागी व्हावे.
      ‘अर्थ अवर २०२४’ मध्ये कोल्हापूर शहरातील विविध भागातील स्ट्रीट लाईट व घरगुती लाईट शिवाय दिसणाऱ्या शहराचे विलोभनीय छायाचित्रे nss.dypcet@dypgroup.edu.in या मेल आयडी वर पाठवावीत असे  आवाहन आयोजकाकडून करण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी , एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश चौगुले,    डॉ. राहुल पाटील, श्री तुषार आळवेकर व विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे यांच्या  मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…