no images were found
कोरगावकर पेट्रोल पंपास एचपी क्लब सुविधांचा सन्मान
शिरोली (पुलाची) /प्रतिनिधी : सांगली फाटा येथील ए.जी. कोरगावकर पेट्रोल पंपास हिंदुस्थान पेट्रोल कंपनीकडून एचपी क्लब अत्याधुनिक व तत्पर) सेवा सुविधांचा प्रथम मान देण्यात आला.
यावेळी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे सेल्स ऑफिसर आदित्य अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील डीलर लोकांच्या उपस्थितीत कोरगावकर पेट्रोल पंप येथे एचपी क्लब फर्स्ट चा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी मार्फत ग्राहकांच्या अत्याधुनिक व तत्पर सेवा सुविधांचा प्रथम सन्मान ए.जी. कोरगावकर पेट्रोल पंपास देऊन
सन्मानित करण्यात आले.
या सोयी सुविधांमध्ये ग्राहकांना आयटीपीएस सुविधेद्वारे इंधन भरताक्षणीच बिल दिले जाते. पेट्रोल डिझेलच्या मापाची व शुद्धतेची हमी असते. एक्वा च्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा. सोलर पावर व ताबडतोब E पावती, सीसीटीव्ही पडताळणी सुविधा, गाडीची समोरील काच स्वच्छ करून मिळेल, अत्याधुनिक टॉयलेट सुविधा, क्लब hp वसुंधरा फंड योजना, यामध्ये एक लिटर इंधनास 1 रुपया झाडांच्या संवर्धनासाठी फंड, आधी सुविधांचा समावेश आहे.
यावेळी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे डीलर बहुसंख्येने उपस्थित होते. कोरगावकर पेट्रोल पंपाचे मालक अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, राज कोरगावकर, अनिकेत कोरगावकर, आदी उपस्थित होते.