Home आरोग्य फिरत्या मॅमोग्राफी व्हॅनच्या उद्घाटनासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्सचा एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशनशी सहयोग

फिरत्या मॅमोग्राफी व्हॅनच्या उद्घाटनासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्सचा एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशनशी सहयोग

40 second read
0
0
24

no images were found

फिरत्या मॅमोग्राफी व्हॅनच्या उद्घाटनासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्सचा एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशनशी सहयोग

 

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन मोबाइल मॅमोग्राफी व्हॅन (स्तनांच्या कर्करोगाचे निदान करणारी फिरती मॅमोग्राफी व्हॅन)’ सुरू करत असल्याची घोषणा करण्यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि टाटा कॅपिटल यांनी एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशनशी (एमओसीएफ) सहयोग केला आहे. भारतातील कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूंमागील आघाडीचे कारण असलेल्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर करण्याच्या दृष्टीने ही व्हॅन खास डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये सर्व्हायकल (गर्भाशयमुख) कॅन्सरसाठी तपासणी करण्याची (पॅप स्मीअर किंवा एलबीसी) तसेच मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्याची तरतूदही असेल. त्यामुळे ही व्हॅन बहुपयोगी ठरणार आहे.

स्तनाच्या कॅन्सरचे निदान शेवटच्या टप्प्यावर होण्यामागील कारणांवर उपाय करण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाने या सहयोगाच्या माध्यमातून ठेवले आहे. फिरत्या मॅमोग्राफी व्हॅनच्या सहाय्याने ग्रामीण व सीमांत भागांत अत्यंत सवलतीच्या दरांमध्ये स्तनांच्या कॅन्सरची तपासणी करून हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार (According to WHO), भारतात स्तनांच्या कॅन्सरचे प्रचलन सातत्याने खूप अधिक राहिले आहे. स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचे प्रमाण बरेच अधिक आहे. स्त्रियांमधील कॅन्सरच्या एकूण रुग्णांपैकी २६ टक्के स्तनांच्या कॅन्सरने ग्रस्त असतात. भारतात नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमध्ये स्तन, मुख व गर्भाशमुखाच्या कॅन्सरचे प्रमाण ३२ टक्के आहे.

या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि टाटा कॅपिटल लिमिटेड यांनी महाराष्ट्रभरातील एक वर्षांच्या मोहिमेद्वारे मॅमोग्राफी तपासण्या करून वंचित व ग्रामीण स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही व्हॅन मॅमोग्राफी यंत्राने सुसज्ज असेल. शिवाय, डॉक्टर्स, तंत्रज्ञ आणि नर्सेसचे पथक व्हॅनमध्ये असेल. ही मोबाइल मॅमोग्राफी व्हॅन महाराष्ट्रभर प्रवास करेल. मराठवाडा, बार्शी, सोलापूर, सातारा, सांगली, कऱ्हाड, येवला, मालेगाव, धुळे आदी दुर्गम व आतील भागांपर्यंत ही व्हॅन जाणार आहे.

व्हॅनला हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम मुंबईत एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मार्केटिंग व सीएसआर विभागाचे प्रमुख श्री. रथिन लाहिरी आणि टाटा कॅपिटल लिमिटेडच्या सीएसआर विभागातील चीफ एथिक्स ऑफिसर आणि शाश्वतता प्रमुख श्री. श्रीधर सारथी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि टाटा कॅपिटल लिमिटेड या कंपन्यांमधील अन्य मान्यवरही उपस्थित होते. शिवाय, एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशनचे सर्व विश्वस्त यावेळी उपस्थित होते. हे सर्व विश्वस्त प्रख्यात कॅन्सर फिजिशिअन्सही आहेत. डॉ. वशिष्ठ मनियार, डॉ. प्रीतम काळस्कर आणि डॉ. क्षितीज जोशी हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मार्केटिंग व सीएसआर विभागाचे प्रमुख श्री. रथिन लाहिरीया उपक्रमाबद्दल म्हणाले, “सुरुवातीच्या टप्प्यावर निदान होणे ही कॅन्सर बरा करण्यातील गुरूकिल्ली आहे. छोट्या शहरांमधील आणि दुर्गम गावांमधील स्त्रियांना जागरूकतेच्या तसेच तपासणी करवून घेण्यासाठी आवश्यक संसाधनांच्या अभावामुळे अनेक महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागतो. कॅन्सर निदान सुविधा ग्रामीण भागापर्यंत सवलतीच्या दरात पोहोचवून ही त्रुटी दूर करण्याचे उद्दिष्ट आमच्या उपक्रमापुढे आहे. त्यामुळे चाचणीच्या सुविधांची कमतरता दूर होऊ शकेल.”

टाटा कॅपिटल लिमिटेडच्या सीएसआर विभागातील चीफ एथिक्स ऑफिसर आणि शाश्वतता प्रमुख श्री. श्रीधर सारथी म्हणाले,”या उपक्रमाच्या माध्यमातून स्तनांच्या कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दर्जेदार तपासणी सुविधा परवडण्याजोग्या दरात पुरवून कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर करण्यात आम्ही उत्तेजन देत आहोत.”

एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशनचे विश्वस्त म्हणाले,”कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या या अर्थपूर्ण उपक्रमासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि टाटा कॅपिटल यांच्याशी सहयोग करता आला याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. विशेषत: छोटी शहरे व दुर्गम भागातील दुर्लक्षित समुदायांना कॅन्सरबद्दलच्या आणि कॅन्सर तपासणीच्या जागरूकतेच्या अभावामुळे खूप काही सहन करावे लागते.”

एसबीआय जनरल इन्शुरन्स, टाटा कॅपिटल आणि एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन यांच्यातील हा सहयोग मोबाइल मॅमोग्राफी व्हॅनच्या रूपात व्यक्त झाला आहे. आरोग्यसेवेपुढील गंभीर आव्हानांवर मात करून रुग्णांचे प्राण वाचवण्यात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिल्टी कशी भूमिका बजावू शकते, याचे हे उदाहरण आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…