Home शासकीय अंध मतदारांसाठी ईव्हीएम मशीन हाताळण्यासाठी विशेष कार्यशाळा संपन्न

अंध मतदारांसाठी ईव्हीएम मशीन हाताळण्यासाठी विशेष कार्यशाळा संपन्न

3 second read
0
0
31

no images were found

अंध मतदारांसाठी ईव्हीएम मशीन हाताळण्यासाठी विशेष कार्यशाळा संपन्न

 

कोल्हापूर :  आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, शाखा कोल्हापूर (NAB) यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अंध मतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी व ईव्हीएम मशीन हाताळणी बाबत विशेष कार्यशाळा आज रामभाई रामानी हॉल, कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन, शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती.

 जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित राहून अंध मतदारांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व अंध मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंद असल्याबाबत खात्री करावी तसेच मतदार यादीमध्ये नाव नसल्यास अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या व प्रशासनाच्या मदतीने मतदार यादीमध्ये तातडीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे लोकसभा मतदानादिवशी सर्व अंध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असेही आवाहन केले.

 यावेळी उपस्थित सर्व अंध मतदारांना ईव्हीएम मशीन हाताळण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अशा प्रकारचे पहिल्यांदा ईव्हीएम मशीन हाताळत असल्याबाबत अंध मतदारांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात अंध विद्यार्थ्यांना कै. शुभदा ठाकूर शिष्यवृत्तीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नॅबचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे व संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच नोडल अधिकारी स्वीप तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, सहाय्यक नोडल अधिकारी सुनील धायगुडे व वर्षा परीट कार्यक्रमास उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज

प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका आपल्या भावनिक आणि र…