
no images were found
खुल्या ओपनस्पेसचे जागेमध्ये विनापरवाना बांधलेले तारेचे कंपाऊंड महानगरपालिकेच्यावतीने निष्काषित
कोल्हापूर – “ई” वॉर्ड सि.स.नं.२६०/९/३ ताराबाई पार्क येथील मंजुर रेखांकनातील खुली ओपन स्पेसचे जागेमध्ये विनापरवाना बांधलेले तारेचे कंपाऊंड महापालिकेच्यावतीने आज निष्कासीत करण्यात आले. सदरचे विनापरवाना तारेचे कंपाउंड वृषाली राजे राजेंद्रसिंह डफळे यांनी विनापरवाना बांधले होते.
सदरची मोहिमेमध्ये शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांचे मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश कांबळे, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, सौ. मिरा नागिमे, सुरेश पाटील, सर्व्हेअर शाम शेटे, इस्टेट ऑफीसर सचिन जाधव, अतिक्रमण पथकाकडील मुकादम रवि कांबळे, दुष्यंत पाटील, मेस्त्री व इतर कर्मचा-यांनी सदरची कारवाई राबविली.