no images were found
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सव
कोल्हापूर (प्रतिनिधि): शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे सन 2023-24 साठी शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव दि. 04/03/2024 ते 07/03/2024 या कालावधीत सकाळी 7:00 ते संध्याकाळी 7:00 वेळेत आयोजित केला आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण 08 खेळ प्रकारांचा समावेश केला असुन सदर खेळ खालील प्रमाणे आहेत.
1- क्रिकेट 2. बास्केटबॉल 3. रस्सीखेच 4. बॅडमिंटन 5. कबड्डी 6. बुध्दीबळ 7. ॲथलॅटिक्स 8 मॅरेथॉन.
या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतीलसुमारे 2000 खेळाडूंनी नोंदणी केली आहे.सदर स्पर्धेचे उद्धाटन विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे हस्ते तसेच प्रकुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सर्व अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्या (दि. ४) सकाळी ७.३० वाजता क्रीड मैदानावर होणार आहे. गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या पारीतोषिक प्राप्त खेळाडूंचा सत्कार त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू यावेळी प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या स्पर्धा घेण्यामागे उद्देश विद्यार्थ्यामध्ये खेळाडु वृत्ती व राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावेत, असा आहे.