no images were found
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत 42506 बालकांचे लसीकरण
कोल्हापूर :शासन आदेशाप्रमाणे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरात राबविण्यात आली. या मोहिमेस शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या मोहिमेचे उद्घाटन उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे सकाळी 8 वाजता करण्यात आला. यावेळी आरोग्याधिकारीडॉ.प्रकाश पावरा, रोटरी संस्था पदाधिकारी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलकडील वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुलेकडील वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णालयातील कर्मचारी व भागातील नागरीक, उपस्थित होते.
या मोहिमेमध्येशहरातील 46,901 बालकांना डोस पाजणेचे उद्दिष्ट होते त्यापैकी 42,506 इतक्या बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. या मोहिमेसाठी शहरात 173 लसीकरण केंद्रात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत डोस पाजण्यात आलेत. तसेच बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, नाके व महालक्ष्मी मंदीर या ठिकाणी मुलांना डोस पाजण्यात आले. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोहिम यशस्वीपणे राबविली.
या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा, सी.पी.आर.हॉस्पीटल कडील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, परिचारीका, नर्सिंग सेंटरकडील प्रशिक्षणार्थी परिचारीका, तसेच डॉ.डी.वाय.पाटील नर्सिंग इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल कॉलेज, जगद्गुरु पंचाचार्य मेडिकल कॉलेज, वेणुताई चव्हाण मेडिकल कॉलेज, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, महालक्ष्मी नर्सिंग स्कूल, उषाताई नर्सिंग कॉलेज, संजीवा नर्सिंग कॉलेज रोटरी क्लब, शहरातील तरुण मंडळे, महिला मंडळे, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच सेवा-भावी संस्था, एन.सी.सी., विद्यार्थी, महालक्ष्मी मंदिर देवस्थान समिती, रेल्वे विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, बी चॅनल, एसपीएन चॅनल, टोमॅटो एफ.एम., कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जी.पी.ए., आय.ए.पी. व छत्रपती राजाराम साखर कारखाना, पोलीस विभाग या सर्वांचे सहकार्य लाभले.
पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दिनांक 3 मार्च 2024 रोजी ज्या पात्र बालकांनी पोलिओ डोस घेतले नसतील त्या बालकांना दिनांक 4 ते 8 मार्च 2024 रोजीपर्यंत घरभेटीच्या माध्यमातून शोध घेऊन पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. तरी गृहभेटीकरीता येणा-या आरोग्य कर्मचा-यांना नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.