no images were found
राहुल जेठवा यांचे ५० हून अधिक जोड्यांचे आकर्षक शू कलेक्शन!
फूटवेअर कार्यक्षम असण्यासह व्यक्तीच्या स्वयं-अभिव्यतीला सादर करतात. कालातीत लोफर्सपासून फॅशनबेबल स्टाइल्सपर्यंत फूटवेअरमधून व्यक्तीची अद्वितीय स्टाइल दिसून येते, तसेच फूटवेअर व्यक्तींच्या पेहरावामध्ये अधिक आकर्षकतेची भर करतात. विविध आकार, मटेरिअल व रंगांमधील परिधान केलेल्या फूटवेअरमधून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व दिसून येते. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मध्ये अवध बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे अभिनेता राहुल जेठवायांना शूजची खूप आवड आहे आणि त्यांच्याकडे ५० हून अधिक जोड्यांचे प्रभावी कलेक्शन आहे. अनेक वर्षांपूर्वी जटिल डिझाइन्स, प्रिमिअम मटेरिअल्स आणि अद्वितीय आरामदायीपणाचे कौतुक करत त्यांना शूज आवडू लागले. त्यांच्यासाठी फूटवेअर अॅक्सेसरीज इतकेच महत्त्वाचे आहे आणि त्यामधून त्यांची वैयक्तिक स्टाइल, मूड आणि विविध फॅशन स्टाइल्स दिसून येतात.
शूज व स्नीकर्सप्रती आपली आवड व्यक्त करत राहुल जेठवा (अवध बिहारी वाजपेयी)म्हणाले, ”शूजप्रती माझे प्रेम आपुलकीसह सुरू झाले. मोठे होत असताना पैशांची अडचण होती, पण शूज खरेदी करण्याची इच्छा कायम होती. असे असताना देखील मी ही आवड जोपासली, जी आजही कायम आहे. शूज परिधान केल्यानंतर फक्त फॅशन वाढत नाही तर माझा आत्मविश्वास देखील वाढतो, आरामदायीपणा मिळतो आणि माझी स्टाइल अधिक आकर्षक होते. अभिनयाव्यतिरिक्त मला नृत्य देखील आवडते. म्हणून, नृत्य करण्यासाठी शूज आरामदायी व टिकाऊ असण्याची गरज आहे. शूज योग्य आकाराचे असण्यासह पायाच्या घोट्याला योग्य आधार देणारे असले पाहिजेत, ज्यामुळे नृत्य करताना दुखापत होत नाहीत आणि स्थिरता मिळते. मला विविध रंग आवडतात, ज्यामधून माझे उत्साही व्यक्तिमत्त्व दिसून येते. मी माझ्या स्टाइलला अनुसरून विविध ब्रॅण्ड्सच्या व स्ट्रीट शूजसह प्रयोग करतो. मी शूजची खरेदी केली आहे आणि आता माझ्याकडे ५० हून जोड्यांचे कलेक्शन आहे, तसेच मी अधिकाधिक शूज खरेदी करणार आहे. माझ्या मते शूज खरेदी करून त्यांचे कलेक्शन करणे साहसी धमाल आहे. प्रत्येक जोडीची सर्वोत्तम गाथा आहे, जेथे ते डिझाइन्स, मटेरिअल्स व वाइब्सचा अनुभव देतात. असे वाटते की, फूटवेअर व्यक्तिमत्त्वाचे वॉर्डरोब तयार करत आहे. मी विविध प्रकारचे ब्रॅण्ड्स व स्टाइल्समधील शूजचा शोध घेतो. तसेच, आकर्षक रंग व पॅटर्न्स तुमच्या अभिव्यक्तीला धमाल पद्धतीने सादर करतात. हे फक्त शूज नसून तुमच्या स्टाइलमध्ये अधिक उत्साहाची भर करणारे साधन आहेत.” ते पुढे म्हणाले, ”नवीन शूजचा बॉक्स खुला करण्याचा रोमांच असो किंवा आऊटफिटला साजेसे शूज शोधण्याचा आनंद असो शूजचे विश्व दैनंदिन जवीनात उत्साहाची भर करते. हे फक्त फूटवेअर नसून प्रत्येक जोडीमधून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व व वैयक्तिक स्टाइल दिसून येते. मी स्मार्ट शॉपर आहे, पण माझा भाऊ विशाल जेठवा माझ्यापेक्षाही अधिक उत्साही व स्मार्ट आहे आणि महागड्या शूजवर मोठ्या प्रमाणात खर्च करतो. माझ्यासाठी शूजमधून माझा प्रवास आणि स्वयं-अभिव्यक्तीप्रती प्रेम दिसून येते. मी आकर्षक लुक, आरामदायीपणा व टिकाऊपाासाठी उच्च दर्जाचे फूटवेअर खरेदी करतो. ट्रेण्ड्स व ब्रॅण्ड्सना एक्स्प्लोअर करण्याचा अनुभव उत्साहवर्धक आहे आणि कलेक्शन तयार करण्यामधून माझी बदलती पसंती दिसून येते. शूजची परिपूर्ण जोडी माझा उत्साह वाढवते. शूजप्रती माझी आवड माझ्या व्यक्तिमत्त्वाला नव्या उंचीवर घेऊन जाईल.”