Home सामाजिक ले ट्रैवेन्यूज़ टेक्नॉलॉजी लिमिटेड तर्फे ‘सेबी’कडे डीआरएचपी दाखल

ले ट्रैवेन्यूज़ टेक्नॉलॉजी लिमिटेड तर्फे ‘सेबी’कडे डीआरएचपी दाखल

1 min read
0
0
22

no images were found

ले ट्रैवेन्यूज़ टेक्नॉलॉजी लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी दाखल

 

ले ट्रैवेन्यूज़ टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या बाजार नियामक संस्थेकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.

प्राथमिक समभाग विक्री योजनेच्या माध्यमातून निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. यामध्ये प्रत्येकी एक रुपया दर्शनीमूल्य असलेल्या एकूण 120 कोटी रुपये किंमतीच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्शू आणि सेलिंग शेअरहोल्डरद्वारे विकण्यात येणाऱ्या 66,677,674 इक्विटी शेअर्सची विक्री (ऑफर फॉर सेल) समाविष्ट असणार आहे.

ले ट्रैवेन्यूज़ टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी इक्सिगो या मल्टी-ॲप धोरण असलेल्या ब्रँडच्या माध्यमातून काम करते. इक्सिगो फ्लाइट्स, इक्सिगो ट्रेन्स, कन्फर्मटीकेटी व अभिबस या ब्रॅंड्सची मालकी कंपनीकडे आहे आणि ती स्वतः हे ब्रॅंड्स चालविते. यापैकी प्रत्येक ब्रॅंडची स्वतःची ॲप्स आहेत. त्या प्रत्येकाकडे फ्लाइटट्रेनबसेस आणि हॉटेल्स यांच्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ही यंत्रणा संबंधित लक्ष्यित ग्राहक गटांसाठी वापरण्यात येते.

ले ट्रैवेन्यूज़ टेक्नॉलॉजी लिमिटेड ही एक आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. भारतीय प्रवाशांना रेल्वेहवाईबस या प्रवासांचे आणि हॉटेल्समधील सहलींचे नियोजनबुकिंग व व्यवस्थापन करण्यासाठी ही कंपनी मदत करते. एफअॅंडएस या संस्थेच्या अहवालानुसारही कंपनी आगामी अब्जावधी वापरकर्त्यांसाठी‘ अग्रगण्य ‘ऑनलाइन ट्रॅव्हल ॲग्रीगेटर’ (ओटीए) म्हणून काम करते. मध्यम व लहान शहरांतील प्रवाशांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेली स्थानिकीकृत सामग्री आणि वैशिष्ट्ये यांवर या कंपनीचा भर असतो. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार एकत्रित उत्पन्नाच्या बाबतीत ही भारतातील दुसरी सर्वात मोठी ओटीए कंपनी आहे (स्रोत: एफअॅंडएस अहवाल). ओटीए रेल्वे मार्केटमधील ही सर्वात मोठी भारतीय रेल्वे तिकीट वितरक आहे. रेल्वे तिकीटांच्या बुकिंगच्या बाबतीत इतर ओटीए कंपन्यांच्या तुलनेत ही कंपनी सर्वात मोठी असून 31st मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार तिचा बाजारपेठेत सुमारे 51 टक्के इतका हिस्सा आहे.

ले ट्रैवेन्यूज़ टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी अलोक बाजपेयी व रजनीश कुमार यांनी २००७मध्ये सुरू केली.

फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील कारणास्तव करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे – १. खेळत्या भांडवलाची गरज काही अंशी भागविणे, २. क्लाउडसारख्या पायाभूत सुविधांमध्ये व तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे आणि ३. काही अज्ञात कंपन्यांचे अधिग्रहण व तत्सम धोरणात्मक उपक्रम, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे यांसारख्या अजैविक वाढीसाठी निधी उपलब्ध करणे.

एसएआयएफ पार्टनर्स इंडिया आयव्ही लि. यांच्याकडील 19,437,465  इक्विटी शेअर्सपीक एक्सव्ही पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट व्ही (पूर्वाश्रमीची एससीआय इन्व्हेस्टमेंट्स व्ही) हिच्याकडील 13,024,000इक्विटी शेअर्स (हे सर्वजण “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”); अलोक बाजपेयी यांच्याकडील11,950,000इक्विटी शेअर्स, रजनीश कुमार यांच्याकडील 11,950,000इक्विटी शेअर्स, मायक्रोमॅक्स इन्फॉरमॅटिक्स लि. यांच्याकडील 5,486,893 इक्विटी शेअर्स, प्लॅसिड होल्डिंग्ज यांच्याकडील 3,048,375इक्विटी शेअर्स, मॅडिसन इंडिया ऑपोर्च्युनिटीज ट्रस्ट फंडची विश्वस्त असलेली कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लि. (पूर्वाश्रमीची माईलस्टोन ट्रस्टीशिप सर्व्हिसेस प्रा. लि.) हिच्याकडील 1,333,513इक्विटी शेअर्स आणि मॅडिसन इंडिया कॅपिटल एचसी यांच्याकडील 447,428इक्विटी शेअर्स (हे सर्वजण “सेलिंग शेअरहोल्डर्स”) यांच्या विक्रीचा कंपनीच्या ऑफर फॉर सेलमध्ये समावेश आहे.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स हे बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ॲक्सिस कॅपिटल लिमिटेडडीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…