no images were found
अचंबित होण्यास सज्ज राहा! दरोगा हप्पू सिंगची मुलगी मलायका बनली एसीपी!
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ अद्भुत व मनोरंजनपूर्ण कथानकासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे प्रेक्षक हसून-हसून लोटपोट होतात. मालिकेमधील पात्र अनेकदा विनोदी स्थितींमध्ये अडकून जातात आणि विविध अवतार व भूमिकांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आगामी कथानकामध्ये मलायका (सोनल पनवारने साकारलेली भूमिका) धाकड एसीपी बनणार आहे, जे पाहून प्रेक्षक अचंबित होतील. मलायका एसीपी म्हणून नवीन लुकमध्ये पाहायला मिळणार आहे, जी शाही व अभ्रष्टाचारी अधिकारी बनण्यासाठी प्रशिक्षण घेते, तसेच न्यायाने व प्रामाणिकपणे वागण्यासह सन्मानाने आपले कर्तव्य बजावते. ती दरोगा हप्पू सिंगपेक्षा (योगेश त्रिपाठीने साकारलेली भूमिका) वेगळी आहे. मलायकाच्या नवीन भूमिकेमुळे हप्पूला आव्हानाचा सामना करावा लागतो, कारण त्याची मुलगी आता त्याची सीनियर बनली असून केसेसचे निराकरण करताना त्यांच्यामध्ये वादविवाद होतात. मलायका पोलिस स्टेशनमध्ये नवीन नियम रुजू करते.
मालिकेमध्ये एसीपीची भूमिका साकारण्याबाबत मलायका (सोनल पनवार) म्हणाली, ”आमची मालिका नेहमी प्रेक्षकांना रोमांचक व मनोरंजनपूर्ण कन्टेन्टचा आनंद देते. मला विश्वास आहे की, हे कथानक प्रेक्षकांना अचंबित करेल. एसीपीची भूमिका साकारण्याचा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे, कारण मी किशोरवयीन मुलीची भूमिका साकारली आहे. पण, माझे व्यक्तिमत्त्व वास्तविक जीवनात मलायकासारखे आहे, ज्यामुळे पोलिस अधिकारी म्हणून भूमिकेमध्ये सामावून जाणे आव्हानात्मक आणि रोचक राहिले आहे. मी पहिल्यांदाच बंदूक हातामध्ये धरली आणि पोलिस युनिफॉर्म परिधान केल्यानंतर मालिकेमधील माझी भूमिका अधिकार गाजवू लागली. मालिकेमधील माझे वडिल दरोगा हप्पू सिंग (योगेश त्रिपाठीने साकारलेली भूमिका) यांच्यासोबत सीन्सची शूटिंग करताना खूप धमाल आली. माझ्या भूमिकेने त्यांच्यावर प्रभुत्व गाजवले, ज्यामुळे कथानकाला उत्साहवर्धक ट्विस्ट मिळाले. मी त्या क्षणांचा खूप आनंद घेतला आणि संपूर्ण टीमने या भूमिकेमधील बदलांसह धमाल केली. ते मला ‘एसीपी मॅडम जी’ म्हणून लागले (हसते). माझी भूमिकेमध्ये वास्तविकता आणण्याची आणि माझे स्पष्टवादी व नीडर व्यक्तिमत्त्व दाखवण्याची इच्छा होती. मलायकाची साहसी भूमिका मला व प्रेक्षकांना महिला सक्षमीकरणाचा प्रबळ संदेश देते. यामधून दिसून येते की महिला साहसी व सुंदर असू शकतात, ज्यासाठी त्यांना पुरूषाच्या पाठिंब्याची गरज नाही. मी असा प्रबळ संदेश देणा-या अधिकाधिक भूमिका साकारण्याची संधी मिळण्याची आशा करते. वास्तविक जीवनात अशा धाडसी नोकरी करणा-या सर्व महिला अधिकारींना माझा सलाम. अभिनेत्री म्हणून मी चित्रपट ‘मर्दानी’ आणि राणी मुखर्जी (शिवानी शिवाजी रॉय) यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करते, ज्यामुळे मला चुकीच्या कृत्यांविरोधात लढणारी सुपरकॉप असल्यासारखे वाटले, पण त्यामध्ये विनोदीशैली समाविष्ट आहे. या अनुभवाने मला माझ्या अभिनय क्षमतांच्या वेगळ्या पैलूंची जाणीव करून दिली. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझेा एसीपी लुक आवडेल.”