no images were found
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय योग व निसर्गोपचार परिषद संपन्न
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने राष्ट्रीय योग व निसर्गोपचार परिषदेची यशस्वी सांगता झाली. मानव्यशास्त्र विभागाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या दोन दिवशीय परिषदेचा सांगता समारंभ जालन्याचे निसर्गोपचार तज्ञ नारायण अंभोरे यांच्या उपस्थितीत व विभागप्रमुख आर. जी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने दर वर्षी विविध परिषदांचे व व्याख्यानांचे आयोजन केले जाते यावेळी योग व निसर्गोपचाराचे नवे आयाम या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी राज्यातील व बाहेरील अनेक योग व निसर्गोपचार तज्ञ उपस्थित होते. परिषदेमध्ये आचार्य हेमंत खेडेकर, अशोक कशाळकर, डॉ. शरदचंद्र भालेकर, नारायण अंभोरे, श्रीमती. किरण सारडा, बिझनेस कोच रविंद्र खैरे आदी मान्यवरांची विविध विषयावर व्याख्याने झाली. दरम्यान योगशास्त्रातील शुध्दीक्रिया विना मालडीकर आणि एम. ए. योगशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या. याशिवाय निसर्गोपचाराची प्रात्यक्षिके डॉ. श्वेतलीना पाटील, अरविंद पालके, यासह विविध तज्ञांनी सादर केली. परिषदेत योग व निसर्गोपचार या विषयावरील विविध शोधनिबंधांचे सादरीकरण संशोधकांनी केले.
या परिषदेसाठी 130 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला होता. सांगता समारंभाचे स्वागत व प्रस्ताविक कानिफनाथ पंढरे यांनी केले. तर आभार आसावरी कागवाडे यांनी मानले. यावेळी यशोधन बोकील, आर. एम. जाधव, प्रमोद कांबळे, प्रिती चव्हाण, निलम मोरे, उदय घाटे, वसंत सिंघन, सुधाकर भोसले, बाळासाहेब पाटील, यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. आर. गुरव, क्षितीजा पाटील यांनी केले. श्वेता आठवले यांच्या योग पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.