
no images were found
रिक्षा चालकाला तब्बल 25 कोटी रुपयांची लॉटरी
मुंबई : केरळमध्ये राहणाऱ्या रिक्षाचालकाला एक दोन लाख नव्हे तर, चक्क 25 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. 25 कोटी रुपयांची लॉटरी लागलेल्या रिक्षा चालकाचं नाव अनूप असून त्याचे वय 32 आहे. अनूपने लॉटरीचं तिकीट तिरुवनंतपुरम येथील पझावंगडी भगवती एजेन्सीतून खरेदी केलेले आहे. केरळ ओणम बंपर लॉटरीत 25 कोटींचे बक्षीस जिंकणारा हा पहिला रिक्षा चालक आहे. तर दुसरं बक्षीस 5 कोटी रुपयांचं होतं, जे तिकीट क्रमांक TG 270912 ला मिळालं आहे.
अनूपने ज्या एजन्सीमधून लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं त्या एजन्सीमध्ये उपस्थित असलेल्या माध्यमांना त्याने सांगितलं की T-750605 ही त्याची पहिली पसंती नव्हती. खरेदी केलेलं पहिलं तिकीट आवडलं नाही म्हणून त्याने दुसरे तिकीट काढले आणि दुसऱ्या तिकीटावर त्याला लॉटरी लागल्याचे त्याने सांगितले.