no images were found
दर्जेदार रस्ते द्या नाहीतर हाडांवरचे उपचार करणारे दवाखाने सुरू करा… ठाकरे गटाकडून आंदोलन
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शहरामधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शिवसेनेने चांगले,दर्जेदार रस्ते मिळावे यासाठी हल्लाबोल आंदोलने केली आहेत, परंतु हे गतिमान शासन व मुर्दाड प्रशासक झोपेचे सोंग घेऊन कोल्हापूरकरांना फसवण्याचा धंदा करीत आहे.शंभर कोटींचे रस्ते मोठा गाजावाजा करत मिरजकर तिकटी येथे नुसताच शुभारंभ केला पण त्याचे पुढे काय झाले ? हे मा. पालकमंत्री महोदयांनी कोल्हापूरकरांना स्पष्ट करावे. कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा फक्त बोर्डावर आणि वर्तमानपत्रांमध्येच बघत आहे, परंतु निधी कुठे मुरतो हे कोल्हापूरकरांना माहिती आहे. या एकंदरीतच शासनाच्या कारभारावर कोल्हापूरकर प्रचंड हैराण झाले आहेत
कोल्हापुरात येणारे पर्यटक सुद्धा प्रशासनाच्या व गतिमान शासनाच्या नावाने बोंब मारत आहेत,निधी मंजूर झाल्यापासून ते काम सुरू होईपर्यंत,माझी -तुझी टक्केवारी किती.. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची भागीदारी किती.. आणि टक्केवारी किती यातच कोल्हापूरचे नाव बदनाम झाले असून विकास कामे होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे .नवीन वाशी नाका ते कळंबा रिंग रोडवर चिव्याच्या बाजाराजवळ रस्त्यावर शेकडो मोठे खड्डे पडले असून इथे प्रशासनातील गेली दीड ते दोन वर्ष एका सुद्धा अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही, लवकरात लवकर कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरू करा अन्यथा पुढील आठवड्यात महानगरपालिकेच्या दारात प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल वाजवण्यात येईल याची नोंद घ्यावी
यावेळी संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, अवधूत साळोखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.