
no images were found
माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांची आर्थिक मदतीची प्रकरणे ऑनलाईन सादर करावीत
कोल्हापूर : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याद्वारा RMEWF योजनेअंतर्गत वर्ष 2024-25 साठी हवालदार रँक पर्यंतच्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांच्या आर्थिक मदतीसाठीची ऑनलाईन प्रकरणे सादर करण्याच्या अंतिम तारखा निर्धारीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील इयत्ता 1 ली ते पदवी (Under Graduation Classes) ची प्रकरणे दिनांक 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत www.ksb.gov.in या संकेतस्थळावर सादर करावीत, असे आवाहन ले. कर्नल राहुल माने (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृह जवळ, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. 0231-2665812 वर संपर्क साधावा.