no images were found
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत ‘जिल्हा संसाधन व्यक्ती‘ पदासाठी अर्ज करा
कोल्हापूर : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हात मिळवणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची नामिकासूची तयार करावयाची आहे. इच्छुक व्यक्तींनी गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे.
संसाधन व्यक्तींसाठी पात्रता – सर्व प्रकारचे पदवीधारक आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे ज्ञान व अनुभव असलेले उमेदवार तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन, वृध्दी, नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी, व्यवस्थापन यासाठी अन्न सुरक्षा सल्ला देण्यासंदर्भात ३ ते ५ वर्षाचा अनुभव असावा, संसाधन व्यक्तींना त्यांनी प्रत्येक लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळवून देण्याच्या दृष्टीने जे सहाय्य केले त्यानुसार मोबदला दिला जाईल. संसाधन व्यक्तींना त्यांनी प्रत्येक लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळवून देण्याच्या दृष्टिने जे सहाय्य केले त्यानुसार मोबदला दिला जाईल. संसाधन व्यक्तीस मंजुरीनंतर प्रती बँक कर्जासाठी 20 हजार रुपये देण्यात येतील. त्यापैकी ५० टक्के रक्कम संबंधित उद्योगास उद्योग आधार, जीएसटी नोंदणी, आधार नोंदणी, उद्योगाची कार्यवाही व लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर अदा केली जाईल. या व्यतिरिक्त मार्गदर्शक सूचना, सविस्तर पात्रता, पारिश्रमिक व इतर (मानधन) अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयात व योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असेही श्री. भिंगारदेवे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.