Home राजकीय भारतीय जनता पक्ष व आघाडीला मिळून ४०० हून अधिक जागा मिळतील-शिवराजसिंह चौहान

भारतीय जनता पक्ष व आघाडीला मिळून ४०० हून अधिक जागा मिळतील-शिवराजसिंह चौहान

1 second read
0
0
32

no images were found

भारतीय जनता पक्ष व आघाडीला मिळून ४०० हून अधिक जागा मिळतील-शिवराजसिंह चौहान

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न, समृद्ध शक्तिशाली आणि विकसित भारताची निर्मिती होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व आघाडीला मिळून ४०० हून अधिक जागा मिळतील. याउलट इंडिया आघाडीची स्थिती आहे, इंडिया आघाडीकडे ना नेता आहे, ना धोरण. इंडिया आघाडी म्हणजे एक दिल के हजार तुकडे हुए, कोई यहां गिरा कोई वहां गिरा.. अशी स्थिती बनली आहे.”अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय उपाध्यक्ष चव्हाण आज कोल्हापूर दोऱ्यावर होते. सकाळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर बिंदू चौक येथे लोकांच्यासोबत चाय पे चर्चा केली. नागाळा पार्क येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच इंडिया आघाडी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी,राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. “भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, जेलपेक्षा भाजप बरा.”अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपवर केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारला असता चौहान म्हणाले,”शरद पवार यांना आता काही काम राहिले नाही. भाजप जे चांगले काम करत आहे. त्यामध्ये खोट काढण्याचे काम ते करत आहेत. राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रा ज्या ज्या राज्यांमधून जाते तेथे इंडिया आघाडी फुटत आहे. इंडिया आघाडीकडे नेता नाही, धोरण नाही. प्रत्येक ठिकाणी वाद-विवाद सुरू आहे. इंडिया आघाडी म्हणजे परिवारवादी पार्टी आहेत. काश्मीरच्या फाळणीला पंडित नेहरू यांचे विदेशी धोरण कारणीभूत ठरले. आज त्यांचे वारसदार भारत जोडो यात्रा काढत आहे यासारखे हास्यास्पद दुसरे नाही. अशी टीकाही चौहान यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ओरिसा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाना, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रचा दौरा केला आहे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण आहे दक्षिण भारतात सुद्धा भाजप मुसंडी मारेल. काँग्रेसच्या नेत्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.
पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, समरजीतसिंह घाटगे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, महेश जाधव, राहुल चिकोडे, शिवाजी पाटील, विजय जाधव, हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…