
no images were found
माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन
माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.