
no images were found
कोल्हापूरला पुढे घेऊन जाणारा यामिनी हा प्रदर्शन उपक्रम: आम. सतेज पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन वर्षे कोविडनंतर रोटरी क्लबच्या वतीने रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ‘यामिनी’ हे प्रदर्शन भरवले जात आहे. ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’च्या माध्यमातून पर्यटना चालना देण्याचा उद्देश आता कार्यरत आहे. शाहू कृतज्ञता पर्वामधून देखील कोल्हापूरला लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न झाले आणि तो प्रयत्न यशस्वी देखील झाला. यामिनीसारखे प्रदर्शन हे कोल्हापूरला पुढे घेऊन जाणारे आहे असे कार्यक्रम सतत होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. आपलं कोल्हापूर म्हणजे नेमकं काय याची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे.
मधुरारीमा राजे छत्रपती यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून कोल्हापुरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे असे प्रतिपादन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. संस्थेच्या अध्यक्षा कविता घाटगे यांनी या प्रदर्शनाबाबत उद्देश विशद केला. या प्रदर्शनातून मिळणारा संपूर्ण निधी हा सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. यावेळी डीजी रोटेरियन व्यंकटेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हॉटेल पॅव्हेलियन येथील या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये ९३ हून अधिक विविध वस्तूंचे विक्रीसाठी स्टॉल्स आहेत. यामध्ये फॅशन आणि लाईफ स्टाइलशी निगडित वस्तू, महिला व लहान मुलांचे कपडे, चप्पल, ज्वेलरी, होम डेकोर, नर्सरी यांच्याबरोबर अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. इचलकरंजी, गोवा, दिल्ली, मुंबई, पुणे, बेळगाव, रत्नागिरी येथून स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनात भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्यासाठी लकी ड्रॉ असणार आहे. प्रसिध्द सिने कलाकार राज हंचनाळे आणि प्रतिक्षा शिवणकर या प्रदर्शनास भेट देणार आहेत. सचिव प्रिती मर्दा, खजनिस डॉ. गीता पिल्लाई, प्रिती मंत्री, संजय साळोखे, मौसमी आवाडे, आरती पवार, विशाखा आपटे, शोभा तावडे, योगिनी कुलकर्णी, सुजाता लोहिया, अंजली मोहिते, मेघना शेळके, सुरेखा इंगरोळे, सविता पदे, आशा जैन, रेणुका सप्रे, यांच्यासह रोटेरियन उपस्थित होते.