Home शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

12 second read
0
0
62

no images were found

शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

 

कोल्हापूर :  भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https:/mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे  शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांचे अर्ज महाडिबीटी या ऑनलाईन प्रणालीवरुन भरण्यासाठी सुचित करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, यांनी केले आहे.

 सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामधील सद्यस्थितीमध्ये अजूनही ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज नुतनीकरण करायचे राहिले असतील, अशा विद्यार्थ्यांनी अर्जाचे नुतनीकरण करावे, तसेच अर्थिक वर्ष 2023-24 संपण्यासाठी अल्प कालावधी शिल्लक असल्याने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जांची छाननी करुन परीपुर्ण अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीव्दारे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत,  असे अवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…