no images were found
पडद्यावरून वास्तव : सृती झा आणि उषा नाडकर्णी यांची जोडी पडद्यावर आणि पडद्यामागेही होत आहे घनिष्ठ
‘झी टीव्ही’ वाहिनीने अलिकडेच प्रसारित केलेली ‘कैसे मुझे तुम मिल गये’ ही मालिका वेगाने प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे. मनाजोगता जीवनसाथी मिळाल्यावर वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते, या तत्त्वावर विश्वास असलेली अमृता (सृती झा) ही मध्यमवर्गीय मराठी मुलगी आणि सर्व मुली या केवळ पैशाच्या मागे असतात, अशी समजूत झाल्याने विवाह या संस्थेवर विश्वास नसलेला विराट (अर्जित तनेजा) या पंजाबी मुलगा यांच्यातील या जवळपास अशक्य वाटणार््या प्रेमकथेचे चित्रण या मालिकेत केले आहे. गेल्या काही भागांमध्ये मालिकेतील नाट्यपूर्ण कौटुंबिक घडामोडींमुळे प्रेक्षकांमध्ये पुढे काय घडेल, त्याबद्दलची उत्सुकता खूपच वाढली आहे. त्यातच अमृताची आजी ज्ञानेश्वरीच्या भूमिकेत नामवंत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा मालिकेत प्रवेश झाल्यामुळे ही उत्सुकता आता अधिकच शिगेला पोहोचली आहे.
मालिकेत अमृता आणि ज्ञानेश्वरी यांच्यात निर्माण झालेले मधुर नाते प्रेक्षकांना आवडत असले, तरी या दोन कलाकारांमध्ये वास्तव जीवनातही खूपच घनिष्ठ मैत्रीसंबंध निर्माण झाले आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. किंबहुना गुणी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्याकडून आपल्याला कितीतरी गोष्टी शिकायला मिळत असल्याचे सृती झा हिने सांगितले. ब्रेकमध्ये या दोघींमध्ये होणार््या गप्पांमुळे या दोन अभिनेत्रींमधील नाते घट्ट होत चालले असून त्याचे प्रतिबिंब मालिकेतील त्यांच्या कामातही पडलेले दिसते.
सृती झा म्हणाली, “उषाजींबरोबर एकत्र भूमिका साकारणं हा मी माझा गौरव समजते. त्यंच्याबरोबर काम करताना मला खूप मजा वाटते. या वयातही त्यांच्यातील उत्साह आणि जोम हा लागट असून त्याचा परिणाम आमच्यावरही होत असतो. त्यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्रीकडून मला खूप काही शिकायला मिळत आहे. पडद्यावर आणइ पडद्यामागे आम्ही दोघी खूप धमाल करीत असतो.”
उषा नाडकर्णी म्हणाल्या, “सृतीबरोबर भूमिका साकारणं हा एक आनंददायक अनुभव ठरला आहे. ती केवळ गुणी अभिनेत्रीच आहे असं नव्हे, तर एक छान सहकलाकारही आहे. आम्हा दोघींचे प्रसंगात आम्ही एकमेकींबद्दल आदरच दर्शवितो. सृतीमुळे सेटवर एक आशादायक आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं. मी तिला माझी मुलगीच मानते आणि आम्ही दोघी एकत्र चित्रीकरण करताना खूप मजा करीत आहोत.”‘कैसे मुझे तुम मिल गये’च्या मन गुंतवून टाकणार््या कथानकाला या दोघींच्या मैत्रीच्या नात्याने उत्साहाचा एक नवा पैलू जोडला गेला आहे. कथानकाला मिळणार््या कलाटण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी उत्कंठा कायम राहील.