1 second read
0
0
101

no images were found

शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड अध्यासन; सोमवारी प्रारंभ

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड अध्यासन स्थापित करण्यात येत असून त्यानिमित्त येत्या सोमवारी (दि. २५) विशेष व्याख्यान आणि शाहिरी सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड यांच्या नावे शिवाजी विद्यापीठात अध्यासन सुरू होत आहे. या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक तथा संपादक उत्तम कांबळे यांचे ‘भारतीय स्वातंत्र्यलढा आणि जी.डी. (बापू) लाड’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरचे शाहीर सदाशिव निकम यांचे शाहिरी सादरीकरणही यावेळी होईल. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात २५ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य अरुण लाड आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…