
no images were found
महाविद्यालयीन विद्यार्थ्याची अपार्टमेंट वरून उडी घेवून आत्महत्या
लातूर : शहरात घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अविनाश व्यंकट सानप असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
अविनाश बार्शी रोडवरील गिरवलकर मंगल कार्यालयाजवळ माधव अपार्टमेंट मध्ये राहत होता. आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी माधवने अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून सकाळी ११ वाजता उडी मारूनआत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अविनाशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी अविनाशचा मोबाईल ताब्यात घेतला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अविनाश लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयामध्ये पदविकेच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होता. त्याच सोबत तो राज्यसेवेच्या परीक्षेचीही तयारी करत होता. अविनाशला एक बहीण असून ती इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. आई-वडील लातूरपासून जवळच असलेल्या मुरुड येथे शिक्षक आहेत. काही दिवसांपूर्वीच बहिणीच्या वाढदिवसाला त्याने पेन गिफ्ट दिला होता. अविनाशने आत्महत्या केली तेव्हा त्याचे वडील घरीच होते तर आई शाळेत नोकरीवर गेली होती तर बहिण काही कामानिमित्त बाहेर गेली होती. वडिलांना न सांगताच अविनाश छतावर गेला आणि उडी मारून आत्महत्या केली. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.