no images were found
उद्या 11 वाजेपर्यंत लटकेना राजीनामा पत्र द्या; हायकोर्टाचा आदेश
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीतील ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टानंं दिलासा दिलाय. उद्या 11 वाजेपर्यंत लटकेना राजीनामा मंजुरी पत्र द्यावे असा आदेश हायकोर्टाने महापालिकेला दिलाय.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्या संदर्भात हायकोर्टानं महापालिकेला प्रश्न विचारला होता. यावर, लटके यांच्यावर लाच घेतल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे राजीनामा स्विकारलेला नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेनं दिलंं होत. मात्र, उद्या 11 वाजेपर्यंत लटकेना राजीनामा मंजुरी पत्र द्यावे असा आदेश हायकोर्टाने दिलाय. त्यामुळे लटकेना दिलासा मिळालाय.