
no images were found
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा भारतीय निवडणूक आयोगाने दिला. ६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या या निर्णयात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे घड्याळ हे निवडणूक चिन्हदेखील अजित पवार गटाला बहाल केले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आज (१३ फेब्रुवारी) त्यासाठीची रितसर प्रक्रिया पार पडण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे गड्याळ हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र निवडणूक आयोगाने पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना शरद पवार गटापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.