Home शैक्षणिक दूरशिक्षण केंद्राच्या  परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ

दूरशिक्षण केंद्राच्या  परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ

11 second read
0
0
27

no images were found

दूरशिक्षण केंद्राच्या  परीक्षा अर्जासाठी  मुदतवाढ

 
कोल्हापूर (प्रतिनिधी):  शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या बी.ए.,बी.कॉम,एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी,समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,इतिहास), एम.कॉम, एम.एस्सी (गणित) आदी अभ्यासक्रमाच्या परीक्षा अर्ज भरणेसाठी विद्यार्थी हितास्तव सोमवार दि.१२ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.
डॉ.मोरे म्हणाले की,एम.ए.,/ एम.कॉम.भाग १ व २, बी.ए.,बी.कॉम. भाग १, २ व ३ मधील जे विद्यार्थी  सेमिस्टर १, ३ व ५ मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी सेमिस्टर २, ४ व ६ चा परीक्षा फॉर्म  भरण्याची आवश्यकता नाही. तसेच जे विद्यार्थी सेमिस्टर १, ३, व ५ मध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांना अनुत्तीर्ण परीक्षा फॉर्म व संबधित अनुत्तीर्ण विषयाची परीक्षा फी भरावी लागणार आहे. तरी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दि१२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने मुदतवाढ दिली असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म वेळेत भरावेत.  ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापी रिपीटरचा फॉर्म भरलेले नाही त्यांनी https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/#/login या लिंकवर जावून भरावा. असे आवाहन प्रा. डॉ. डी. के. मोरे यांनी केले आहे.
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…