no images were found
मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात महाआरोग्य शिबिरांचे आयोजन
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले जाणार असून, मा.मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांअंतर्गत कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील नामांकित रुग्णालयांच्या माध्यमातून विविध रोगांवरील मोफत तपासण्या, पुढील उपचाराकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शहरात तीन दिवस विविध ठिकाणी हि आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये दि.०८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९ ते दुपारी २ वा.पर्यंत विश्वशांती चौक कनाननगर, सदर बाजार हौ.सोसायटी सदरबाजार, मातंग वसाहत राजारामपुरी २ री गल्ली येथे, दि.०९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९ ते दुपारी २ वा.पर्यंत समाज मंदिर सिद्धार्थ नगर, राजाराम चौक गंजीमाळ, बुद्धविहार विचारेमाळ, येथे दि.१० फेब्रुवारी २०२४ सकाळी ९ ते दुपारी २ वा.पर्यंत वारेवसाहत मंगळवार पेठ, आंबेडकर नगर कसबा बावडा या ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.