no images were found
जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला रुपाली चाकणकर यांचे उत्तर
पुणे : राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याला अजितदादा गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पलटवार केलाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुश्मनाचाही बाप मरू नये असे म्हणणारे आम्ही आणि अजित पवारांनी तर सर्व हद्द ओलांडली. ज्या माणसांनी तुम्हाला राजकारणात आणलं. ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसविले. त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयी ही म्हणता येणार नाही. पाषाणालाही पाझर फुटतो पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिले नाही तुम्ही भावना शून्य झाला आहेत अशी टीका अजित पवार यांच्यावर केली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या अजित पवार यांच्यावरील याच टीकेला रुपाली चाकणकर यांनी जळजळीत उत्तर दिले आहे. राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचे काम करत आहेत अशी टीका चाकणकर यांनी केलीय.
अजितदादा यांच्या बोलण्याचा मतितार्थ वेगळा काढून लोकांची दिशाभूल करू नका. लोकं हुशार आहेत. त्यांना दुधात मिठाचा खडा टाकणारे आव्हाड सहज कळतात. त्यामुळे तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा! असा टोलाही रुपाली कॅह्कंकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.
Bबारामतीत लहान पोरांनाही माहीत आहे ही बारामती कोणी नांगरली. तिची मशागत कोणी केली. कोणी कुणाच्या हातात दिली. तिथं भावनिक आवाहन करतील. नाही त्या ठिकाणी बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. बारामतीत मी केलं, बारामतीत मी केलं असे म्हणता. पण, बारामती दिली कोणी तुम्हाला? ते बारामती भलत्याला देऊ शकले असते. कोणी आणले बारामतीत डायमयनिक्स? कुणी आणली बारामतीत MIDC? कुणी आणला csr फंड? तुम्हाला माहित होता का csr फंड अशी टीका आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली.
शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे.. आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वीपासून बघितलं. कोणत्याच मिटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हता. जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे तेव्हा तुम्ही बरं बरं असचं झालं पाहिजे म्हणायचे आणि तुमची नजर असायची भलतीकडे. या महाराष्ट्राला कळेल की काय माणूस आहे हा की आपल्या काकांच्या मृत्यूची वाट बघतोय. हे राजकारण आहे का अजित पवार असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.
सत्ता गेली तरी चालेल पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारच असे म्हणणारे शरद पवार, महिलांना आरक्षण देणारे शरद पवार, त्यांच्या घोषणा आणि पॉलिसी ऐका, लातूरला भूकंप झाला, दीड महिना तिथेच राहिले आणि घर उभारली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. लाज वाटतेय आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची. आंतरराष्ट्रीय कंपन्या येतात, जागतिक दर्जाचे नेते बारामतीला येतात ते तुमच्यामुळे येतात का? तुमची उंची तर ओळखा असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला होता.