no images were found
देश बळकट होण्यासाठी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे : मनोज नरवणे
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : संरक्षण बजेट हे देशाच्या सुरक्षिततेसाठीची गुंतवणूक असते . देश बळकट होण्यासाठी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे , असे प्रतिपादन भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केले.
आशाये या ६५ व्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी प्रमुख उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे गव्हर्नर रो. नासिर बोरसदवाला परिषदेचे चेअरमन रो.राजीव परीख उपस्थित होते.कोल्हापूर, सांगली रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सावंतवाडी, संपूर्ण गोवा याबरोबरच हुबळी, धारवाड बेळगाव या उत्तर कर्नाटक राज्यातील २ हजारहून अधिक रोटेरियन या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत.
श्री. नरवणे पुढे म्हणाले,शांतता हवी असेल युद्धासाठी तयार रहा. पण त्यासाठी क्षमता तयार करणे हे मोठ्या नियोजनाचे काम आहे.वर्तमानात आणि भविष्यात आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत ,याचा विचार करायला हवाबाह्य जगातील धोक्याबरोबर अंतर्गत धोके सुद्धा तितकेच डोळसपणे पाहणे गरजेचे असते .किंबहुना अंतर्गत सुरक्षितते कडे ज्यादा लक्ष द्यायला हवे. जगात काय घडते ,याचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. युवा पिढीने स्वतःची आवडीकडे लक्ष द्या.केवळ मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा आपण जे करतो त्यातून संविधान जपतो का ? ते देशहिताचे आहे का ?हे पाहणे गरजेचे आहे.
अदृश्य काडसिद्धेशर स्वामीजी यांनी सांगितले की, संपूर्ण जगात अत्यंत प्रभावी काम रोटरीने केले आहे. लोकांची सेवा करणे हे व्रत रोटरीने जपले आहे. रोटरीचे सदस्य जगभर सेवाकार्य करत आहेत.कणेरी मठासाठी अनेक सुविधा रोटरीने उपलब्ध करून दिल्याबददल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रोटरी ३१७० चे प्रांतपाल नासीर बोरसदवाला यांनी कोल्हापूरात रोटरी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स घेताना आनंद होत आहे. यामुळे रोटरी सदस्यामध्ये संवाद आणि मैत्रीची भावना वाढण्यास निश्चित मदत होईल असे नमूद केले. कॉन्फरन्स चेअरमन राजीव परीख यांनी परिषद आयोजनाची सविस्तर माहिती दिली. सचिव विक्रांत कदम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी हेन्री टॅन (सिंगापूर) , रोटरी इंटरनॅशनल ग्रॅंट ऑफिसर रेबेका मेंडोजा (अमेरिका ), कॉन्फरन्स काऊन्सिलर वासुदेव देशींगकर, शरद पै, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील , भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, सौ. सकिना बोरसादवाला , रोटरी मुव्हमेंट प्रेसिडेंट चंदन मिरजकर , ब्रम्हकुमारी परिवारातील आंतरराष्ट्रीय वक्त्या सुनिता दीदी, देशाचे माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर तसेच संयोजन समितीचे राहुल कुलकर्णी, सचिन मालू,दिव्येश वसा, ऋषिकेश खोत , दिलीप शेवाळे ,डॉ.महादेव नरके यांच्यासह सर्व माजी प्रांतपाल, रोटरी क्लबचे अध्यक्ष , सचिव आदी मान्यवर उपस्थित होते.कॉन्फरन्स सचिव प्रसन्न देशिगकर यांनी आभार मानले. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध आवाजाचे जादूगार श्री चेतन सशीतल यांनी आपल्या आवाजाच्या कलेने सर्वांना मंत्रमुग्ध केले.