Home शासकीय सुप्रीम कोर्ट, हायकोर्टातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढवण्याचा ठराव मंजूर

सुप्रीम कोर्ट, हायकोर्टातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढवण्याचा ठराव मंजूर

0 second read
0
0
218

no images were found

सुप्रीम कोर्ट, हायकोर्टातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढवण्याचा ठराव मंजूर

नवी दिल्ली  : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय वाढवण्याचा ठराव भारतीय बार कौन्सिलच्या नुकत्याच  झालेल्या संयुक्त बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

घटना दुरुस्ती करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वरून 65 वर्षे करावे आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 67 वर्षे करावे,” असे बीसीआयने एका निवेदनात म्हटले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या सर्व राज्य बार कौन्सिल, हायकोर्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त बैठकीत उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती.

दरम्यान, विविध आयोग आणि इतर मंचांचे अध्यक्ष म्हणून अनुभवी वकिलांची नियुक्ती करता यावी यासाठी विविध कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार संसदेकडे करण्याचा प्रस्तावही या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान यशस्वी करूया – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ 

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान …