
no images were found
वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकरणी विरोधकांकडून आंदोलन
कोटीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता परंतु सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता इतर राज्यात जाणार आहे. या मधून महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहे, असं मत राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आले आहे.
मुंबई : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना टीकेचे धनी बनवलं जात असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मुंबईत युवासेनेने सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. तर युवासेनेने मुंबईत सरकारच्या विरोधात आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.
वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन सुरू आहे. “मोदी ने क्या दिया? लॉलीपॉप लॉलीपॉप” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी भाजप सरकार विरोधात पुण्यात आंदोलन सुरू असून या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेदेखील सहभागी आहेत. “वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा 1 लाख 54 हजार अशा गुंतवणुकी बाहेर गेल्या तर महाराष्ट्र प्रगती कशी करेल, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राज्याच्या हितासाठी त्यांनी यावर सर्वपक्षीय बैठक बोलावून मार्ग काढावा कारण दोन ते तीन लाख रोजगाराचा हा प्रश्न असून याबाबत सरकारने गंभीर होणे गरजेचे आहे” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.
वेदांता आणि फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पातून गुजरातला मोठा फायदा होणार असून महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान या प्रकल्पामध्ये १.५४ लाख कोटी रूपयांचा गुंतवणूक केली जाणार होती. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे राज्यात जवळपास १ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असती पण हा प्रकल्प हलवल्यामुळे महाराष्ट्र या फायद्याला मुकणार आहे.