no images were found
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन येत आहेत. आता मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे.
“मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं असल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह देशभरातील विविध शहरांत बॉम्ब हल्ले होण्याची धमकी दिली जात आहे. तसंच, विमानात बॉम्ब ठेवल्याच्याही धमक्या मिळाल्या होत्या. परंतु, चौकशीअंती हे फोन बोगस असल्याचं स्पष्ट झालं होतं. दरम्यान, आज आलेल्या संदेशाचीही चौकशी सुरू आहे.