Home शासकीय जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसाठी सोमवारी मोफत मार्गदर्शन

जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसाठी सोमवारी मोफत मार्गदर्शन

54 second read
0
0
38

no images were found

                                                                                                                

 

कोल्हापूर : जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व परीक्षार्थींसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात ‘स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन सत्र’ आयोजित करण्यात आले आहे.

 भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्री. हर्षवर्धन बी.जे. व महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023, रँक 89, श्री. ओंकार बजागे हे या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी व परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्यासाठी तसेच या परीक्षांमध्ये जिल्ह्यातील युवकांचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दर महिन्याच्या पाच तारखेला ‘स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिर’ घेण्यात येत आहे.

महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परीक्षा, आवश्यक पात्रता, यासाठीची तयारी आदींबाबत मार्गदर्शन करत आहेत. यासह आपल्या अनुभवाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, प्राथमिक तयारी करणाऱ्यांनी नेमकी सुरुवात कशापासून करावी आदी विविध पातळींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्यात विविध अधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा होईल, अशी माहिती करवीरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी दिली आहे.                                          

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…