Home सामाजिक रोटरीची अशाये ६५ वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० परिषद २ ते ४ फेब्रुवारी तीन दिवस कोल्हापुरात होणार

रोटरीची अशाये ६५ वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० परिषद २ ते ४ फेब्रुवारी तीन दिवस कोल्हापुरात होणार

13 second read
0
0
32

no images were found

रोटरीची अशाये ६५ वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० परिषद २ ते ४ फेब्रुवारी तीन दिवस कोल्हापुरात होणार

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :रोटरी परिवारातील सदस्यांसाठी पर्वणी ठरणारी “*आशाये* ” ही 65 वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० ही परिषद २,३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापुरात सुवर्णभूमी लॉन्स,शिरोली जकात नाका या ठिकाणी संपन्न होणार आहे. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते आणि सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे गव्हर्नर रो. नासिर बोरसदवाला आणि परिषदेचे चेअरमन रो.राजीव परीख, कॉन्फरन्स कौन्सिलर डॉ. रो.वासुदेव देशिंगकर, सचिव रो. विक्रांत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी हेन्री टॅन (सिंगापूर) व रोटरी इंटरनॅशनल ग्रॅंट ऑफिसर रेबेका मेंडोजा (अमेरिका )हे या परिषदेला खास उपस्थित राहणार आहेत.या परिषदेबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, रोटरी ही जागतिक पातळीवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी संस्था आहे. रोटरी परिवारातील सदस्यांचे प्रबोधन व्हावे,विविध विषयातील नवनवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, एकमेकातील संवाद वाढावा, या उद्देशाने दरवर्षी होणारी कॉन्फरन्स यावेळी कोल्हापुरात संपन्न होत आहे. कोल्हापूर, सांगली रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सावंतवाडी, संपूर्ण गोवा याबरोबरच हुबळी, धारवाड बेळगाव या उत्तर कर्नाटक राज्यातील २ हजारहून अधिक रोटेरियन या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत .उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध आवाजाचे जादूगार श्री चेतन सशीतल हे आपल्या आवाजाच्या कलेने सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
      परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयडीबीआय बँकेचे चेअरमन टी. एन. मनोहरन हे “सत्यम प्रकरणातील बोध”, तर ब्रम्हाकुमारी परिवारातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्त्या राजयोगिनी डॉ.बी.के सुनिता दीदी या “सुंदर जीवनाचा मार्ग”, रिबेका मेंडोझा ( अमेरिका) या “माणुसकीचा पाया” , तसेच प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.सुरज पवार “समाजाला परतफेड“तसेच प्रसिद्ध लेखक ग्रीनस्टोन लोबो हे “शास्त्रैाक्त ज्योतिषकला” यावर मार्गदर्शन करणार आहेत.
       सायंकाळच्या सत्रात भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर हे “भारतासमोरील सांस्कृतिक आव्हान” या विषयावर संवाद साधणार असून अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. विश्वास नांगरे पाटील हे “मन मे है विश्वास” या विषयातून आपला प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर उलगडणार आहेत.या दिवशी सन २०२२-२३ या वर्षातील डिस्ट्रिक्ट अवॉर्डचे वितरण होणार आहे.
       परिषदेच्या तिसऱ्या दिवशी डॉ.जी. एस .कुलकर्णी हे “दीर्घायुष्याचा मंत्र”, तर संदीप गादिया हे “सायबर क्राईम”आणि प्रख्यात लेखक आशुतोष रारावीकर “आनंददायी पथप्रकाश” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.या परिषदेमध्ये विविध प्रदर्शनीय स्टॉल्स देखील ठेवलेले आहेत त्याचबरोबर दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी होणार आहेत.
या परिषदेकरीता डी. वाय. पाटील ग्रुप, भीमा बिजनेस ग्रुप, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, एस.बी रिशेलर्स, श्रीराम फाउंड्री, सरोज फाउंड्री ,मेनन अँड मेनन लिमिटेड, अमृता इंडस्ट्रीज, सुदर्शन जीन्स, माय हुंडाई, ट्रेंडी व्हिल्स( महिंद्रा कार), डॉ. सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
        ही परिषद यशस्वी करण्यासाठी कॉन्फरन्स सचिव प्रसन्न देशिंगकर, खजानिस बी.एस शिंपुगडे, रो.राहुल कुलकर्णी , ऋषिकेश खोत,दिव्यराज वसा, सचिन मालू, दिलीप शेवाळे,श्रीकांत मोरे ,गौरव शहा, बाळासाहेब कडोलकर, मानसिंग पानसकर, शरद पाटील, चंदन मिरजकर, अरविंद कृष्णन,सुजाता लोहिया सिद्धार्थ पाटणकर, विनोद कांबोज, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. दिग्विजय पाटील, राजशेखर संबर्गी, सचिन झंवर, डॉ. महादेव नरके यांची टीम कार्यरत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…