
no images were found
रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन मध्ये पृथ्वीराज पाटील, वेदिका जाधव प्रथम
कोल्हापूर : कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत आज शेंडापार्क येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धा आरोग्य सेवा विभागाचे सहाय्यक संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकामार्फत घेण्यात आल्या.
कोल्हापूर परिमंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य डॉ. विनीत फाळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, जिल्हा क्रीडा अॅथ सचिव प्रकुल पाटील, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अमर पोवार या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेतली.
मॅरेथॉनसाठी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचे सहकार्य मिळाले. स्पर्धेमध्ये मुलींमध्ये प्रथम कु. वेदिका दिपक जाधव (प्रायव्हेट इंग्लिश मिडीयम स्कूल), व्दितीय कु. अवंतिका राजेश भोसले (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज), तृतीय कु. स्वराली सागर चव्हाण (उषाराजे हायस्कूल) यांचे तर मुलांमध्ये प्रथम कु. पृथ्वीराज सतीश पाटील (वि.स. खांडेकर प्रशाला), व्दितीय कु. कार्तिक संभाजी ढवण (युवा अॅथ. क्लब को.), तृतीय कु. शिवम संतोष पासवान (न्यु इंग्लिश मेडीयम स्कूल) या विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक 8 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 5 हजार व तृतीय क्रमांक 3 हजार रुपये (मुले व मुली) यांना विभागून देण्यात आले.
मॅरेथॉनमध्ये शाळांचा उत्स्फुर्त सहभाग
श्रीमती आनंदीबाई ना. सरदेसाई हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, सानेगुरुजी वसाहत, शाळा नं ७९, दादासाहेब अ. मगदूम हायस्कूल, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वि.स. खांडेकर प्रशाला, न्यु इंग्लिश मिडियम स्कूल संभाजीनगर, श्री शिवशक्ती विद्यालय, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, प्रबुध्द भारत हायस्कूल, जवाहरनगर हायस्कूल, श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय, कोल्हापूर हायस्कूल, भाई माधवराव बागल विद्यालय, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, विक्रम हायस्कूल, नुतन मराठी विद्यालय, युवा अॅथ क्लब कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. आरोग्य सेवाचे (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. परवेज पटेल, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमलता पालेकर, डिएनटी एमओ डॉ. शोभा भोई तसेच दोन्ही कार्यालयातीन सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.