Home सामाजिक शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

3 min read
0
0
20

no images were found

शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

 

  कोल्हापूर : शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2023-24 ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरु, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर इ.संभाव्य देशांची निवड करण्यात आली असून देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया बरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर, शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसीत केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटीव्दारे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2023-24 ही योजना राबविण्यात येत आहे.

शेतकरी निवडीचे निकष-अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. स्वत:च्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसेच त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र 1). शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व 18 वर्षाखालील मुले/मुली) शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकरी किमान बारावी पास असावा. बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान सहा महिने असावी. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटट), अभियंता, कंत्राटदार इ.नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषि विद्यापीठामार्फत तसेच स्थानिक संस्थामार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषि विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस.डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7-10 दिवस कालावधीचा पदरेश दौरा<

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…